Photo Credit; instagram

वर्कआउटच्या आधी आणि नंतर काय खाल्लं पाहिजे? अनंत अंबानीच्या कोचने सांगितल्या 'या' टिप्स

Photo Credit; instagram

अनंत अंबानीने केवळ 18 महिन्यांत 108 किलो वजन कमी केलं. सेलिब्रिटी फिटनेस कोच विनोद चन्ना यांनी त्यांना वजन कमी करण्यास मदत केली. ते नीता अंबानीचे देखील कोच राहिले आहेत.

Photo Credit; instagram

विनोद नेहमी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फिटनेस आणि वजन कमी करण्याच्या टिप्स किंवा माहिती शेअर करत असतात.

Photo Credit; instagram

नुकतंच त्यांनी वर्कआउटच्या आधी आणि नंतर काय खाल्लं पाहिजे, याबद्दल इंस्टाग्रामवर सांगितलं. हेल्दी पद्धतीने वजन कमी करण्याच्या त्यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत.

Photo Credit; instagram

विनोद यांच्या म्हणण्यानुसार, वर्कआउटच्या आधी शरीराला ऊर्जा मिळवण्याऱ्या डाएटची गरज असते. त्यासोबतच व्यायामाच्या वेळेकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं असतं.

Photo Credit; instagram

व्यायाम करण्याच्या आधी अर्धा तास वेळ असल्यास लवकर पचणाऱ्या पदार्थांचं सेवन करायला हवं. अशात सहज पचणारी आणि एनर्जी देणारी फळे तुम्ही खाऊ शकता.

Photo Credit; instagram

तसेच, वर्कआउटच्या आधी जास्त वेळ असल्यास तुम्ही प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असलेल्या पदार्थांचं सेवन करु शकता.

Photo Credit; instagram

तसेच विनोद यांच्या मते, व्यायाम केल्यानंतर म्हणजेच वर्कआउटनंतर प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर असलेल्या पदार्थांचा डाएटमध्ये समावेश केला पाहिजे.

Photo Credit; instagram

वर्कआउटच्या आधी आणि नंतर योग्य आहार घेतल्याने हेल्दी पद्धतीने तुम्ही वजन कमी करु शकता. असं केल्याने सोप्यरितीने तुम्ही शरीराचे मसल्स बनवू शकता.

पुढील वेब स्टोरी

'या' 5 ठिकाणी घर घेणं... नरकाहून कमी नाही! चाणक्य नितीमध्ये काय सांगितलंय?

इथे क्लिक करा