Photo Credit; instagram

थांबा जरा! सलग 21 दिवस बिअर पिताय? शरीरावर होतात हे सर्वात घातक परिणाम

Photo Credit; instagram

उन्हाळ्याच्या ऋतूत सतत बिअर पिणं लोकांना आवडतं. मात्र, जर तुम्ही सतत 21 दिवस दररोज बिअर प्यायली तर त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम पाहायला मिळतात.

Photo Credit; instagram

बिअरमध्ये असलेले अल्कोहोल शरीराला डिहायड्रेड करतं. उन्हाळ्यात सहाजितच शरीराला अधिक पाण्याची आवश्यकता असते, त्यात सतत बिअर प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. यामुळे चक्कर, थकवा आणि लो बिपीसारखे आजार उद्भवतात.

Photo Credit; instagram

बिअरमध्ये  भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. Mayo Clinic नुसार, एका 350 ml बिअरमध्ये जवळपास 150 कॅलरीज असतात. रोज बिअर प्यायल्याने पोटजवळ चरबी जमा होते, ज्याला 'बिअर बेली' म्हणतात.

Photo Credit; instagram

सतत 21 दिवस बिअर प्यायल्याने लिव्हरवर दबाव वाढतो. NIAAA च्या रिपोर्टनुसार, नियमित अल्कोहोलचं सेवन केल्यानं लिव्हर फॅट, सूज आणि लिव्हर सेरोसिस सारख्या समस्या उद्भवतात.

Photo Credit; instagram

बिअरमध्ये अल्कोहोल असल्याकारणाने झोपेची गुणवत्तासुद्धा कमी होते. Harvard Health नुसार, अल्कोहोल मुळे झोप तर येतेच पण गाढ झोप येत नाही.  यामुळे दिवसभर आळस आणि चिडचिड होते.

Photo Credit; instagram

दररोज बिअर प्यायल्याने ब्लड शूगर पातळी असंतुलित होते. यामधील कार्ब्स आणि अल्कोहोलमुळे इन्सूलिनवर प्रभाव पडतो. यामुळे डायबिटीजचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

बिअर शरीरातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे शोषण कमी करते. बिअर प्यायल्याने व्हिटॅमिन B12, मॅग्नेशियम आणि झिंकची पातळी कमी होते. यामुळे थकवा, केसगळती आणि त्वचेसंबंधी समस्या उद्भवतात.

Photo Credit; instagram

सतत बिअर प्यायल्याने मानसिक आरोग्यावरसुद्धा परिणाम होतो. Journal of studies on Alcohol and Drugs नुसार, अल्कोहोल एन्झायटी आणि डिप्रेशनला ट्रिगर करू शकतात.

Photo Credit; instagram

NIAAA च्या रिपोर्टनुसार, सतत 21 दिवस बिअर प्यायल्याने शरीरातील डोपामाइनची पातळी असंतुलित होऊ लागते. सतत बिअर पिण्याची सवय व्यसनात बदलू शकते.

Photo Credit; instagram

कधीतरी मर्यादेत बिअर पिणं ठीक असतं. मात्र, सतत 21 दिवस बिअर प्यायल्याने शरीर आणि मानसिक अवस्थेवर सुद्धा विपरित परिणाम होतात. हेल्दी समरसाठी लिंबू पाणी किंवा नारळ पाणी चांगला पर्याय ठरू शकतात.

पुढील वेब स्टोरी

RCB च्या यशानंतर कोहलीची अनुष्काला फ्लाइंग Kiss!

इथे क्लिक करा