Photo Credit; instagram

'या' एका गोष्टीमुळे 4 आठवड्यात 8 इंच बॅली फॅट केलं कमी! एक्सपर्ट्सचं मत काय?

Photo Credit; instagram

केवळ 4 आठवड्यात पोटाची 8 इंच चरबी कमी करणं हे ऐकायला जितकं चांगलं आणि सोपं वाटतं तितकं करणं खूप अवघड आहे.

Photo Credit; instagram

एका महिलेने हे करून दाखवलं आहे. नुकताच फिटनेस इन्फ्लुएनसरने याबद्दल एक व्हिडीओ शेअर करुन त्यांनी हे करुन दाखवल्याचा दावा केला आहे.

Photo Credit; instagram

आता त्या फिटनेस इन्फ्लुएनसरने एका महिन्यात पोटाची 8 इंच चरबी कमी करण्यासाठी नेमकं काय केलं? याविषयी सविस्तर जाणून घ्या.

Photo Credit; instagram

फिटनेस इन्फ्लुएन्सर दीप्ती धाकड यांनी एका खास व्यायामामुळे त्यांनी 4 आठवड्यात 8 इंच पोटाची चरबी कमी केली असल्याचा दावा केला आहे.

Photo Credit; instagram

अल्टरनेट लेग रेज एक्सरसाइझ पोटाची चरबी थेट कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याचं त्यांनी व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. हे सुरुवातीला पाय कमी उचला नंतर हळूहळू ते उंचावर न्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Photo Credit; instagram

परंतु, तज्ज्ञांच्या मते, या व्हायरल झालेल्या एक्सरसाइझमुळे लगेच फरक दिसत नाही.

Photo Credit; instagram

फरीदाबाद येथील मेट्रो हॉस्पिटलचे डॉ. उदित कपूर म्हणतात की शरीराच्या कोणत्याही भागातून चरबी कमी करणे (ज्याला स्पॉट रिडक्शन म्हणतात) हा बहुतेक लोकांचा गैरसमज आहे.

Photo Credit; instagram

त्यांच्या मते, पोटाची चरबी कमी करण्यासाठी केवळ व्यायामच नाही तर निरोगी आहार आणि संपूर्ण शरीराची हालचाल आवश्यक आहे. फक्त पाय वर-खाली करून वेगानं परिणाम मिळणे कठीण आहे.

Photo Credit; instagram

लेग रेज यासारख्या व्यायामांमुळे पोटाचे स्नायू नक्कीच बळकट होतात, परंतु पोटाची चरबी कमी करण्यासाठी, तुम्हाला योग्य आहार आणि नियमित व्यायामाचा संपूर्ण प्लॅन आवश्यक आहे.

पुढील वेब स्टोरी

चेहऱ्यावर लावा ज्येष्ठमध; चुटकीसरशी सुरकुत्या होतील गायब!

इथे क्लिक करा