वाढत्या वयासोबत तरुण त्वचेसाठी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्यांपासून सुटका मिळवण्यासाठी ज्येष्ठमधाचा वापर उत्तम आयुर्वेदिक पर्याय ठरू शकतो.
Photo Credit; instagram
ज्येष्ठमधात ग्लॅब्रिडिन आणि लिक्विरिटिन सारखे तत्त्वं आढळतात. हे घटक त्वचेच्या वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करतात.
Photo Credit; instagram
ज्येष्ठमधातील हे घटक फ्री रेडिकल्सपासून त्वचेचा बचाव करतात आणि कोलेजन ब्रेक होण्याला आळा घालतात.
Photo Credit; instagram
ज्येष्ठमध त्वचेचा टोन उजळ करण्यासोबत चेहऱ्यावरील फाइन लाइन्स आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.
Photo Credit; instagram
चेहऱ्यावर ज्येष्ठमध लावण्यासाठी एक चमचा ज्येष्ठमधाची पावडर घ्या. त्यात एक चमचा दुध, गुलाब जल आणि काही मधाचे थेंब टाकून चांगली पेस्ट बनवून घ्या.
Photo Credit; instagram
हे लावण्यासाठी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि ब्रश किंवा हाताच्या साहाय्याने चेहऱ्यावर ज्येष्ठमधाची पेस्ट लावा. आता 20 ते 30 मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर सुकू द्या. त्यानंतर हल्क्या कोमट पाण्याने चेहरा धुवून त्यावर मॉइश्चराइझर लावा.
Photo Credit; instagram
आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय केल्याने चांगला फरक पाहायला मिळेल. जर तुमची त्वचा जास्त सेन्सेटिव्ह असेल तर हा डर्मेटॉलॉजिस्टच्या सल्ल्याने हा उपाय करा.
Photo Credit; instagram
मात्र जास्त प्रमाणात चेहऱ्यावर ज्येष्ठमधाची पावडर लावल्याने त्वचा ड्राय होऊ शकते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
सावधान! आंब्यासोबत 'हे' पदार्थ खाताय? तब्येतीचा विषय होईल गंभीर