Photo Credit; instagram

सुटलेलं पोट चांगलं दिसत नाही ना... कमी करण्याचे 7 बेस्ट उपाय!

Photo Credit; instagram

बदलत्या जीवनशैलीचा आणि आहाराच्या अयोग्य पद्धतीचा परिणाम आरोग्यावर होत असतो. काही अशा टिप्सविषयी जाणून घ्या, ज्यांच्या साहाय्याने तुम्हाला फिट राहण्यास मदत मिळेल.

Photo Credit; instagram

नियमित योगा हा शरीराची चरबी कमी करण्यासाठी उत्तम उपाय मानला जातो. यामुळे शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्यदेखील चांगले राहते. त्यामुळे दिनचर्येत योगाचा समावेश असायला हवा.

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी वॉक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चांगला रिझल्ट मिळवण्यासाठी दिवसातून कमीत कमी 10 हजार स्टेप्स किंवा 8 किलोमीटर पर्यंत ब्रिस्क वॉक करणं गरजेचं आहे.

Photo Credit; instagram

डाएटचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यामुळे आहारात प्रोटीन रीच डाएटचा नक्की समावेश करा आणि मसाले पदार्थांचं अधिक प्रमाणात सेवन करणं टाळा.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला अगदी कमी काळात वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही काही दिवसांसाठी साखरयुक्त पदार्थ खाणं पूर्णपणे टाळू शकता. यामुळे तुम्हाला चांगला परिणाम पाहायला मिळेल.

Photo Credit; instagram

रात्री जेवणानंतर लगेच अंथरुणावर पडणे लठ्ठपणाला आमंत्रण देते. त्यामुळे रात्री थोडं लवकर जेवण्याचा आणि जेवल्यानंतर वॉक करण्याचा प्रयत्न करा.

Photo Credit; instagram

शरीरातील पुरेसं पाण्याचं प्रमाण मेटाबॉलिजम सुधारण्यास मदत करते. मात्र, पाण्याचं कमी प्रमाण ब्लोटिंग, कॉन्स्टीपेशन सारख्या समस्येला कारणीभूत ठरू शकते.

Photo Credit; instagram

सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफीऐवजी जिऱ्याचे पाणी, कोमट पाणी, कोथिंबीरीचं पाणी किंवा ग्रीन ज्यूस प्या.

पुढील वेब स्टोरी

Health : ग्लुकोज कमी झाल्यानं होतात तुम्हाला 'हे' त्रास, करू नका दुर्लक्ष

इथे क्लिक करा