आंबा कापायचा पण नाही, तरी 2 सेकंदात समजेल गोड की आंबट!
Photo Credit; instagram
उन्हाळा हा आंब्याचा ऋतू असतो. अशातच, आता प्रत्येकालाच गोड आणि रसाळ आंबे खावेसे वाटतायेत. मात्र आंबे खरेदी करताना ते गोड आहेत की नाही? हे ओळखणं अवघड वाटतं.
Photo Credit; instagram
त्यामुळे आम्ही तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या साहाय्याने तुम्ही अगदी सोप्यारितीने आंबा गोड आहे की नाही, हे ओळखू शकाल.
Photo Credit; instagram
जर आंब्याचा वास अननस किंवा खरबूजासारखा असेल तर तो छान पिकलेला आणि गोड असण्याची शक्यता असते.
Photo Credit; instagram
जर आंबा स्पर्श केल्यावर हलका आणि थोडा मऊ वाटत असेल तर तो नक्कीच गोड आणि रसाळ असू शकतो.
Photo Credit; instagram
मात्र जर आंबा खूपच मऊ वाटत असेल तर तो जास्त पिकलेला किंवा खराब असण्याची शक्यता असते.
Photo Credit; instagram
जर आंब्यावर रेषा आणि सुरकुत्या असतील तर तो बेचव निघू शकतो. असे आंबे खरेदी करणे टाळा.
Photo Credit; instagram
आंबा खरेदी करताना त्याच्या देठाकडे लक्ष द्या. जर त्यातून थोडासा रस येत असेल तर समजून जा की आंबा रसाळ आणि गोड आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
बदाम खाताना साल फेकून देता? मग, त्यांचा 'असा' करा वापर