Photo Credit; instagram

डार्क सर्कल्सपासून सुटका हवीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Photo Credit; instagram

डोळ्यांखाली डार्क सर्कल्स म्हणजेच काळेपणा येण्याची समस्या अगदीच सामान्य बनली आहे. यासाठी थकवा, तणाव आणि चुकीच्या सवयी कारणीभूत ठरू शकतात.

Photo Credit; instagram

काही सोप्या आणि सरळ पद्धतींचा अवलंब केल्यास ही समस्या दूर केली जाऊ शकते.

Photo Credit; instagram

अपुरी झोप हे डार्क सर्कल्सचं मोठं कारण ठरू शकतं. पुरेशी झोप न मिळाल्याने डोळ्यांखालची त्वचा पातळ आणि सूजलेली दिसते. यामुळे जास्त डार्क सर्कल्स दिसतात.

Photo Credit; instagram

मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीच्या स्क्रिनवर जास्त वेळ घालवल्याने डोळ्यांवर दबाव पडतो. थकवा जाणवल्यामुळे डार्क सर्कल्सचे प्रमाण वाढते.

Photo Credit; instagram

शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी होते. त्यामुळे डोळ्यांखालचा काळेपणा अधिक प्रमाणात दिसू लागतो. दिवसातून कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्या. यामुळे त्वचा ग्लोइंग होण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

वाढत्या तणावामुळे त्वचा आणि डोळ्यांवर थेट परिणाम होतो. स्ट्रेस होर्मोनचा परिणाम ब्लड सर्क्यूलेशनवर होतो आणि यामुळे डार्क सर्कल्सचे प्रमाण वाढते. मेडिटेशन किंवा योगा यावर चांगला उपाय ठरतो.

Photo Credit; instagram

तसेच, लोह, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E, आणि व्हिटॅमिन K च्या कमतरतेमुळे डार्क सर्कल्स वाढू शकतात. त्यामुळे आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, नट्स आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.

पुढील वेब स्टोरी

सकाळी डोळ्यावरची झोप लवकर जात नाही? तुमच्यासाठी टीप्स

इथे क्लिक करा