सकाळी डोळ्यावरची झोप लवकर जात नाही? तुमच्यासाठी टीप्स
Photo Credit; instagram
चांगली झोप झाल्यावर संपूर्ण दिवस देखील चांगला जातो. झोप पूर्ण झाली नसल्यास पूर्ण दिवस थकवा जाणवतो. काही अशा टिप्स जाणून घ्या, ज्यांच्या साहाय्याने सकाळी लवकर न थकता उठता येईल.
Photo Credit; instagram
झोपेचं एक शेड्यूल ठरवा. ठरवलेल्या वेळेतच झोपण्याच्या प्रयत्न करा. असं केल्यास वेळेवर झोपण्याची सवय लागेल आणि सकाळी लवकर उठण्यास मदत होईल.
Photo Credit; instagram
झोपण्याआधी एक निश्चित दिनचर्या ठरवा. झोपण्यासाठी बेडवर गेल्यानंतर फोन किंवा लॅपटॉपचा वापर टाळा. तसेच कॉफीचं सेवन करू नका. झोपण्याच्या आधी मेडिटेशन केल्याने चांगला फायदा मिळतो.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला अलार्म Snooze करण्याची सवय असेल तर फोन किंवा अलार्म क्लॉक थोडं दूर ठेवा. जेणेकरून, ते बंद करण्यासाठी तुम्ही अंथरूणातून उठाल.
Photo Credit; instagram
आहाराचा देखील झोपेवर परिणाम होतो. रात्री हल्कं अन्न खाल्ल्याने चांगली झोप लागते. तसेच, फास्ट फूड खाऊन झोपल्याने झोपेत समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; instagram
तसेच, नियमित व्यायाम केल्याचा सल्ला दिला जातो. व्यायाम केल्याने स्लीप क्वालिटी चांगली होते.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला स्लीप डिसऑर्डर असेल तर वेळीच यावर उपचार करा. कारण, निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे.
Photo Credit; instagram
अशाप्रकारे, तुमच्या दिनचर्येत काही बदल केल्याने सकाळी न थकता तुम्ही लवकर उठू शकता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
वेलचीचं पाणी प्या आणि त्वचेला किती फायदे होतात ते पाहा