Photo Credit; canva

चेहऱ्यावर दही लावून बघा... मिळतील चकित करणारे फायदे

Photo Credit; canva

धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्वचेशी संबंधित बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. अशा समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती आणि नैसर्गिक उपाय प्रभावी आणि सुरक्षित पर्याय मानला जातो.

Photo Credit; canva

आपल्या स्वयंपाकघरातील दही केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा तितकंच फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.

Photo Credit; canva

दहीमधील लॅक्टिक अॅसिड आणि नैसर्गिक फॅट त्वचेला आतून ओलावा देतात. यामुळे त्वचा चमकदार आणि मुलायम होते. चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे दही लावून ठेवा आणि थंड पाण्याने धुवून घ्या.

Photo Credit; canva

दह्यात बरेच अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे चेहऱ्यावर लावल्याने जळजळ कमी होऊन त्वचेला थंडपणा मिळतो. चेहऱ्यावर दही लावल्याने लालसरपणा आणि जळजळ पासून सुटका मिळवता येते.

Photo Credit; canva

दही चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल नियंत्रणात ठेवण्याचं काम करतं. आठवड्यातून 2 ते 3 वेळा दह्याचा फेस पॅक लावल्याने पुरळ आणि त्वचेवरील बॅक्टेरिया कमी करता येऊ शकतात.

Photo Credit; canva

दहीमधील लॅक्टिक अॅसिड डेड सेल्स काढून टाकून डाग हल्के होतात. यासोबतच त्वचा तणावापासून दूर होऊन ताजीतवानी होते.

Photo Credit; canva

दह्यात व्हिटॅमिन B आणि प्रोटीन असतं. मधासोबत चेहऱ्यावर दही लावल्याने नैसर्गिक ग्लो मिळतो.

Photo Credit; canva

दह्याचा फेस पॅक बनवण्यासाठी 2 चमचे दह्यात 1 चमचा मध मिसळा आणि 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.  

पुढील वेब स्टोरी

प्रोटीन वाढीसाठी नॉन व्हेज नाही तर.. 'या' 4 भाज्या खा

इथे क्लिक करा