Sara Tendulkar: ना महागडे प्रोडक्ट्स; ना स्ट्रिक्ट डाएट... हिच्या फिटनेसचं रहस्य तरी काय?
Photo Credit; instagram
क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
Photo Credit; instagram
तिच्या फिटनेस आणि चमकदार त्वचेने सर्वांनाच वेड लावले आहे. अशातच, प्रत्येकाला तिच्या फिटनेस आणि सौंदर्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे.
Photo Credit; instagram
साराने अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत तिची निरोगी जीवनशैली शेअर केली. सारा म्हणाली की ती तिच्या दिवसाची सुरुवात 1 ग्लास पाणी, मूठभर काजू आणि एक कप ब्लॅक कॉफीने करते.
Photo Credit; instagram
ती म्हणाली, "मी माझी सकाळ पाणी, काजू आणि एक कप ब्लॅक कॉफीने सुरू करते. मला सकाळी लवकर उठायला आवडते. कॉफीशी मी कधीच तडजोड करत नाही."
Photo Credit; instagram
तिने डिटॉक्स ज्यूसचा सुद्धा तिच्या दिनचर्येत समावेश केला आहे. परंतु, तिला तिचं दिवसांचं वेळापत्रक साधं आणि सोपं ठेवायला आवडतं.
Photo Credit; instagram
सारा तेंडुलकरची त्वचा खूपच सेन्सेटिव्ह आहे. त्यामुळे ती वापरत असलेल्या स्किन प्रोडक्सबद्दल खूप काळजी घेत असल्याचं तिने सांगितलं.
Photo Credit; instagram
ती रात्रीच्या वेळी अॅसिड किंवा रेटिनॉल सारखे एक्टिव्ह घटक टाळते. विशेषतः जर ती दुसऱ्या दिवशी उन्हात राहणार असेल तर ती असे घटक वापरत नाही, कारण यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.
Photo Credit; instagram
ती म्हणते की माझी त्वचा आणि फिटनेसकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन खूप सोपा आहे. ती स्ट्रिक्ट जीवनशैली पाळण्यापेक्षा तिच्या त्वचेच्या गरजा समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करते.