Photo Credit; instagram

गोड बोलणारी पण कपटी लोकं 'अशी' ओळखा, 7 गोष्टी ठेवा लक्षात!

Photo Credit; instagram

आपल्या आसपास स्वार्थासाठी दुसऱ्यांचा वापर करणारे बरेच लोक असतात. त्यामुळे आपल्या सुरक्षिततेसाठी अशा हुशार आणि कपटी माणसांना ओळखणं खूप गरजेचं असतं.

Photo Credit; instagram

गरजेपेक्षा जास्त कौतुक: बऱ्याचदा असे चतुर लोक तुम्हाला खुश करण्यासाठी तुमची गरजेपेक्षा जास्त प्रशंसा करतात. यामधून तुमच्यातील कमतरता जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतात.

Photo Credit; instagram

प्रत्येक गोष्टीत स्वार्थ पाहणे: असे लोक नेहमी आपला स्वार्थ लक्षात घेऊनच काम करतात. जर त्यांना एखाद्या गोष्टीत स्वत:चा फायदा दिसत नसेल तर ते त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.

Photo Credit; instagram

भावनांचा खेळ करतात: कपटी लोक नेहमी राग आणि दु:ख व्यक्त करून तुम्हाला दोषी असल्याचं दर्शवतात. तुमच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी असे लोक हा मार्ग अवलंबतात.

Photo Credit; instagram

आपली चूक कधीच न मानणे: चतूर आणि कपटी लोक नेहमी आपली चूक दुसऱ्यांवर ढकलतात. स्वत:ला निर्दोष दाखवून ते तुम्ही दोषी असल्याचं सिद्ध करतात.

Photo Credit; instagram

असे लोक त्यांच्या बोलण्यातून इतरांचा गोंधळ उडवतात. प्रत्येक परिस्थितीत गोष्टी फिरवून सांगण्याचा प्रयत्न करतात, म्हणजेच खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करतात.

Photo Credit; instagram

विश्वास संपादन करुन धोका देणं: असे लोक सुरूवातीला तुमचा विश्वास संपादन करतात मात्र, वेळेनुसार ते त्यांचे खरे रंग दाखवतात. असे लोक इतरांचा विश्वासघात करतात.  

Photo Credit; instagram

स्वत:ला बरोबर असण्याचं सिद्ध करणं: असे लोक वादांमध्ये नेहमी आपण बरोबर असल्याचं सिद्ध करतात. अशा वेळी ते कधीच इतरांना कमी लेखण्यात संकोच बाळगत नाहीत.

पुढील वेब स्टोरी

काय सांगता? 'या' मुलांकाच्या लोकांचं होतं चक्क दोन वेळा लग्न!

इथे क्लिक करा