Photo Credit; instagram

केस गळतायेत? हा रामबाण घरघुती उपाय माहितीये का?

Photo Credit; instagram

सध्या केसगळती ही अगदीच सामान्य समस्या बनल्याचं पाहायला मिळतंय. बरेचजण या समस्येवर कित्येक उपाय करत असतात. मात्र, केसगळतीवर कांद्याचा रस हा रामबाण घरगुती उपाय असल्याचं सांगितलं जातं.

Photo Credit; instagram

व्हिटॅमिन, मिनरल्स आणि सल्फरसारखे पोषक तत्त्वं असलेला कांद्याचा रस केसांची मुळे मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर ठरतो. आयुर्वेदात, केसांसाठी कांद्याचा रस रामबाण असल्याचं सांगितलं गेलंय.

Photo Credit; instagram

कांद्याचा रस केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे. कांद्यामधील सल्फर केसांची मुळे मजबूत करण्यासाठी आणि नवीन केस तयार होण्यासाठी मदतशीर ठरते.

Photo Credit; instagram

कांद्याच्या रसामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सीडेंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे स्कॅल्पसाठी फायदेशीर असतात.

Photo Credit; instagram

कांद्याचा रस स्कॅल्प स्वच्छ ठेवण्यासाठी मदतशीर ठरतो आणि यामुळे केसातील कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळवता येते.

Photo Credit; instagram

कांद्याच्या रसाचा नियमितपणे वापर केल्याने वेळेआधीच केस पांढरे होण्याला आळा घालता येतो.

Photo Credit; instagram

कांद्याच्या रसामुळे स्कॅल्पमधील ब्लड सर्क्यूलेशन वाढण्यास मदत होते. कांद्याच्या रसाने स्कॅल्पवर मसाज केल्याने ब्लड फ्लो वाढण्यास मदत मिळते.

पुढील वेब स्टोरी

आहारात या भाज्यांचा करा समावेश, कायम दिसाल तरूण...

इथे क्लिक करा