Photo Credit; instagram

पुरुषांनो! 30 वयानंतर एनर्जी कमी होते? लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' बदल

Photo Credit; instagram

वयाच्या 30 वर्षांनंतर पुरुषांमध्ये एनर्जी लेव्हल कमी होऊ लागते. तसेच, मेटाबॉलिजम देखील कमी होऊन हाडं कमजोर होतात.

Photo Credit; instagram

अशात प्रत्येक पुरुषाने वयाच्या 30 वर्षांनंतर आपल्या लाइफस्टाइलमध्ये काही खास बदल केले पाहिजेत. यामुळे ते अधिक काळ निरोगी राहू शकतील.

Photo Credit; instagram

वयाच्या तिशीत पोहचता पोहचता अचानक उच्च रक्तदाब, शूगर, कोलेस्ट्रॉल असे आजार जडण्याचा धोका उद्भवतो, त्यामुळे वर्षातून एकदा फूल बॉडी चेकअप नक्की करुन घ्या.

Photo Credit; instagram

जंक फूड्स आणि प्रोसेस्ड फूडपासून दूर राहा. अधिक भाज्या, फळे, डाळी, नट्स आणि लो फॅट्स प्रोटीन असलेले पदार्थ खा. यामुळे वजन आणि ब्लड शूगर नियंत्रणात राहील.

Photo Credit; instagram

आठवड्यातून कमीत कमी 4 ते 5 दिवस 30 मिनिटांचं वॉक, जिम, योगा किंवा स्विमिंग करा. यामुळे मेटाबॉलिजम अॅक्टिव्ह राहून थकवा कमी होतो.

Photo Credit; instagram

हाडं मजबूत ठेवण्यासाठी दूध, दही किंवा व्हिटॅमिन D आणि कॅल्शियम युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. यामळे हाडं मजबूत राहतील आणि वाढत्या वयात त्रास होणार नाही.

Photo Credit; instagram

दररोज 7 ते 8 तासांची झोप घ्या. झोपेच्या कमतरतेमुळे इम्यूनिटी कमकुवत होऊ शकते. यामुळे तणाव वाढतो आणि होर्मोनल असंतुलन होऊ शकतं.

Photo Credit; instagram

वर्क लाइफ बॅलेन्स ठेवा. यासाठी मेडिटेशन, छंद, फॅमिली साठी वेळ आणि डिजिटल डिटॉक्स तणाव कमी करण्यासाठी मदतशीर ठरतात.

Photo Credit; instagram

स्मोकिंग, जास्त मद्यपान किंवा कोणत्याही प्रकारचं व्यसन शरीराला कालांतराने नुकसान पोहचवू शकतो. अशात, यापासून दूर राहा. 

पुढील वेब स्टोरी

4. घरात 'या' दिशेत लावा घड्याळ; पैशांची चणचण होईल दूर...

इथे क्लिक करा