घरात 'या' दिशेत लावा घड्याळ; पैशांची चणचण होईल दूर...
Photo Credit; instagram
प्रत्येकाच्या घरातील भिंतीवर घड्याळ पाहायला मिळतं. वास्तुशास्त्रात, योग्य दिशेत घड्याळ लावल्याने घरात सुख-समृद्धी आणि आर्थिक भरभराट पाहायला मिळते.
Photo Credit; instagram
लोक बऱ्याचदा घराची शोभा वाढवण्यासाठी भिंतीवर घड्याळ लावतात. मात्र घरात चुकीच्या दिशेत घड्याळ लावल्याने आर्थिक समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; instagram
घराच्या कोणत्या दिशेत घड्याळ लावणं धन लाभ आणि कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने फायद्याचं ठरतं? याविषयी जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार, घरातील उत्तर दिशा कुबेराची दिशा असल्याचं मानलं जातं. या दिशेत घड्याळ लावल्याने कुबेराचा आशिर्वाद मिळतो. यामुळे आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारते.
Photo Credit; instagram
घरातील उत्तर दिशेत घड्याळ लावल्याने घरात आर्थिक स्थिरता वाढते आणि कौटुंबातील सदस्यांच्या प्रगतीचे मार्ग उपलब्ध होतात.
Photo Credit; instagram
उत्तर दिशेत घड्याळ लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता पसरते. ही दिशा घरातील शांत आणि आनंदी वातावरण तसेच आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने शुभ मानली जाते.
Photo Credit; instagram
वास्तुच्या नियमांनुसार, या दिशेत घड्याळ लावल्याने नवरा-बायकोच्या नात्यात गोडवा राहतो आणि घरगुती ताण कमी होतो. ही दिशा कुटुंबातील सदस्यांची एकता टिकवून ठेवते.
Photo Credit; instagram
घरात बंद किंवा तुटलेलं घड्याळ ठेवू नये. यामुळे कौटुंबिक प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात.
Photo Credit; instagram
दक्षिण दिशेत घड्याळ लावणं टाळलं पाहिजे. यामुळे घरात नकारात्मकता आणि आर्थिक नुकसान होऊ शकतं. घरातील घड्याळ नेहमी स्वच्छ ठेवा आणि योग्य दिशेत असेल, याची खबरदारी घ्या.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
लवकरच चांगले दिवस येतील! फक्त 'हे' 5 शुभ संकेत... पाहा