Photo Credit; instagram

Fat to Hot: जिमला न जाता 30 किलो वजन घटवलं तरी कसं? फिगर आणली शेपमध्ये!

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी केवळ जिम आणि डाएट इतकंच अनेकांच्या मनात येतं. मात्र, वजन कमी करण्यासाठी डिसिप्लिन म्हणजेच शिस्त सुद्धा रुटीनचा भाग असायला हवा.

Photo Credit; instagram

न्यूट्रिशनिस्ट उदिता अग्रवाल यांनी डाएटिंग आणि वर्कआउटसोबत सातत्य आणि योग्य रूटीन फॉलो करुन केवळ 8 महिन्यात 30 किलो वजन कमी केलं.

Photo Credit; instagram

उदिताने आपली स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली आणि त्यात इच्छाशक्ती आणि डेली रूटीनच्या मदतीने वजन कमी केलं असल्याचं तिने सांगितलं.

Photo Credit; instagram

जास्त मीठामुळे शरीरात पाणी जमा होऊ शकतं. तसेच साखर इन्सुलिनची पातळी वाढवतं. उदिता संध्याकाळी 6 वाजल्यानंतर मीठ आणि साखरविरहित पदार्थ खायची.

Photo Credit; instagram

उदिता सकाळी आणि संध्याकाळीसुद्धा वर्कआउट करायची. ती दररोज रात्री 20 ते 30 मिनिटे वॉक करायची. असं केल्याने पचनक्रिया सुरळीत होते आणि कॅलरीज बर्न होतात.

Photo Credit; instagram

उदिता संध्याकाळी 7 वाजता डिनर करायची. हल्कं परंतु प्रोटीनयुक्त डिनरमध्ये ती उकडलेली अंडी, डाळीचं सूप, ग्रिल्ड पनीर किंवा टोफू स्टिर फ्राय घ्यायची.

Photo Credit; instagram

हर्बल टीमुळे मेटाबॉलिजम वाढतं. तसेच ती वजन कमी करण्यासाठी दिवसातून एकदाच चहा प्यायची. यामध्ये ती ग्रीन टी किंवा आल्याचा चहा घ्यायची.

Photo Credit; instagram

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात लोक बऱ्याच झोपेकडे दुर्लक्ष करतात. उदिताने झोपेकडे पूर्ण लक्ष दिलं. यामुळे तिला कमी भूक लागायची आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळाली.

Photo Credit; instagram

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ती नियमित मॅग्नेशियम ग्लाइसीनेट घ्यायची. यामुळे चांगली झोप लागते आणि पचनक्रिया सुरळीत होते. तसेच मूड देखील चांगला राहतो.

पुढील वेब स्टोरी

फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा

इथे क्लिक करा