ही राणी नव्हे कैदाशीण.. कुटुंबातील लोकांसोबत नको ते करायची!
Photo Credit; AI
इतिहासात अनेक क्रूर राण्या झाल्या आहेत. त्यापैकी एक होती मेडागास्करची राणी रानावलोना. तिने सत्ता मिळविण्यासाठी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या.
Photo Credit; AI
रानावलोनाचा जन्म 1788 मध्ये एका सामान्य कुटुंबात झाला. तिच्या कुटुंबाचा राजघराण्याशी कोणताही संबंध नव्हता. तरीही ती मेडागास्करची राणी बनली.
Photo Credit; AI
रानावलोना राणी बनण्याची कहाणीही रंजक आणि तितकीच भयानक आहे. राणी बनल्यानंतर तिने तिच्या लोकांना आणि विरोधकांना क्रूरपणे मारले. तिने मेडागास्करवर 30 वर्षे राज्य केलं.
Photo Credit; AI
राणी रानावलोना ख्रिश्चन धर्माच्या विरोधात होती आणि तिच्या जमातीच्या म्हणजेच मेरीनासच्या परंपरांवर तिचा दृढ विश्वास होता.
Photo Credit; AI
रानावलोनाच्या वडिलांना मेरिना राज्याचा भावी राजा अँड्रियानम्पोइनिमेरिना याला मारण्याचा कट रचल्याची माहिती मिळाली आणि तिने तिच्या स्वामीला त्याबद्दल सांगितलं.
Photo Credit; AI
अँड्रियानम्पोइनिमेरिना याबद्दल खूप कृतज्ञ होता आणि म्हणून त्याने रानावलोनाला दत्तक घेतले. यावर त्याने वचन दिले की रानावलोना त्याचा मुलगा रादामाशी लग्न करेल.
Photo Credit; AI
जेव्हा रादामा राजा झाला तेव्हा रानावलोना त्याच्या बारा पत्नींपैकी पहिली होती. जेव्हा राजा रादामाचा मृत्यू झाला तेव्हा रानावलोनाला मूलबाळ नव्हते.
Photo Credit; AI
तेव्हा तिचा भाचा राकाटोबे, जो रानावलोनाच्या बहिणीचा मुलगा होता, तो सिंहासनाचा उत्तराधिकारी बनला.
Photo Credit; AI
त्यावेळी कायद्यानुसार, रानावलोनाचे कोणतेही मूल सिंहासनाचा वारसा घेऊ शकत होते, जरी ते मूल रादामाच्या मृत्यूनंतर जन्मले असले तरीही.
Photo Credit; AI
याचाच अर्थ, राकाटोबे रानावलोनाला मारू शकत होता. त्यामुळे रानावलोनाने त्याला आपल्या मार्गातून बाजूला करण्याचा निर्णय घेतला आणि स्वत:ला राणी म्हणून घोषित केलं.
Photo Credit; AI
तिच्या काही विश्वासू सहकाऱ्यांच्या मदतीने, राणीने राजवाडा ताब्यात घेतला. त्यानंतर तिने राकाटोबे, त्याची आई आणि कुटुंबातील अनेक सदस्यांना ठार मारले.
Photo Credit; AI
तिने सर्वांना उपाशी ठेवून मारून टाकले. फक्त राकाटोबेला भाल्याने भोसकून मारण्यात आले. अशाप्रकारे, 12 जून 1829 रोजी राणीचा औपचारिक राज्याभिषेक करण्यात आला.
Photo Credit; AI
यानंतरही तिने कायदेशीर खटल्याच्या नावाखाली लोकांना विषारी बिया खाऊ घालून मारण्याची परंपरा सुरू केली. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांवरही तिने बरेच अत्याचार केले.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
एअर होस्टेस बनण्यासाठी काय करावं लागतं? किती असतो पगार?