परफ्यूम जास्त वेळ टीकत नाही? हा सोप्पा फंडा जाणून घ्या...
Photo Credit; instagram
अनेकदा आपण परफ्यूम लावल्यानंतर त्याचा सुगंध थोड्या वेळानंतर लगेच गायब होतो. घाम, उष्णता आणि चुकीच्या पद्धतीने परफ्यूम लावल्याने अशी समस्या उद्भवते.
Photo Credit; instagram
मात्र, काही सोप्या टिप्सच्या साहाय्याने तुम्हाला तुमच्या परफ्यूमचा सुगंध फार काळ टिकवता येऊ शकतो.
Photo Credit; instagram
अंघोळीनंतर काही वेळानंतर लगेच परफ्यूम लावा. स्वच्छ आणि मॉइश्चराइझ्ड त्वचेवर परफ्यूम लावल्याने तो बराच काळ टिकतो.
Photo Credit; instagram
परफ्यूम लावण्याच्या आधी त्वचा मॉइश्चराइझ करा, कारण कोरड्या त्वचेवर परफ्यूम लावल्याने तो फार काळ टिकत नाही. अशावेळी सुगंध नसलेल्या मॉइश्चराइझचा वापर करा.
Photo Credit; instagram
परफ्यूम नेहमी पल्स पॉइंट्स वर लावा, जसे की मान, मनगट, कानांच्या मागे लावा. अशा ठिकाणी परफ्यूम लावल्याने तो फार काळ टिकतो.
Photo Credit; instagram
परफ्यूम लावताना कपड्यांवर सुद्धा हलकं स्प्रे करा. मात्र, असं करताना कपड्यांवर परफ्यूमचे डाग लागणार नाहीत, याची काळजी घ्या.
Photo Credit; instagram
परफ्यूम लावल्यानंतर त्याला हातांनी घासू नका. असे केल्याने परफ्यूमचा सुगंध लवकर उडण्याची शक्यता असते.
Photo Credit; instagram
परफ्यूम नेहमी योग्य ठिकाणी स्टोर करा. उन्हात किंवा उष्णतेच्या ठिकाणा परफ्यूम लावल्याने त्याची क्वालिटी कमी होते. परफ्यूम नेहमी थंड आणि कोरड्या जागेवर ठेवा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Sara Tendulkar: ना महागडे प्रोडक्ट्स; ना स्ट्रिक्ट डाएट... हिच्या फिटनेसचं रहस्य तरी काय?