Photo Credit; instagram

पावसाळ्यात त्वचेची चिंताच करु नका... कोलेजन वाढीसाठी फक्त 'हे' खा

Photo Credit; instagram

पावसाळ्यात ओलावा आणि हवेमुळे त्वचेतील कोलेजनचं प्रमाण कमी होतं. यामुळे त्वचेतील ओलावा कमी होऊन ती कोरडी दिसू शकते.

Photo Credit; instagram

कोलेजन त्वचा, हाडं आणि सांध्याच्या मजबूतीसाठी फायद्याचं ठरणारं एक प्रोटीन आहे. हे प्रोटीन त्वचा तरुण आणि निरोगी दिसण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतं.

Photo Credit; instagram

योग्य आणि पोषक फूड्सचं सेवन केल्याने पावसाळ्यात त्वचेच्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. पावसाळ्यात सुद्धा त्वचा हेल्दी, तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी कोणत्या पदार्थांचं सेवन करायला हवं? याबद्दल जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

स्पिरुलिना हे निळ्या-हिरव्या रंगाचे शैवाल (algae) असून त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात. हे कोलेजनच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतं.

Photo Credit; instagram

शेवग्यामध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन E मोठ्या प्रमाणात आढळतं. शेवग्याच्या पानांची पावडर कोलेजनच्या वाढीसाठी आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करण्यासाठी फायदेशीर ठरते.

Photo Credit; instagram

पावसाळ्यात मिळणारी हुलगे म्हणजेच कुळीथ डाळीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट्स असतात. यामुळे फ्री रेडिकल्सपासून बचाव होऊन कोलेजन तुटण्यापासून वाचवते.

Photo Credit; instagram

मुबलक प्रमाणात ओमेगा-3 आणि प्रोटीन असलेले चिया सीड्स कोलेजन मजबूत बनवण्यासाठी आणि त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

Photo Credit; instagram

पावसाळ्यात टोमॅटो आणि बीटचा ज्यूस प्यायल्याने चांगले फायदे मिळतात. टोमॅटोमध्ये लाइकोपीन असतं, जे UV किरणांपासून बचाव करतं. तसेच बीटमध्ये  शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी उपयुक्त असणारे घटक असतात.

Photo Credit; instagram

मांसाहारी लोक पावसाळ्यात बोन ब्रोथ किंवा पाया सूप पिऊ शकतात. यामध्ये भरपूर प्रमाणात कोलेजन आणि प्रोटीन असते. त्यामुळे याच्या सेवनाने त्वचा टाइट दिसू शकते.

पुढील वेब स्टोरी

बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!

इथे क्लिक करा