UPSC प्रीलिम्स पास करण्यासाठी काय गरजेचं? विकास दिव्यकिर्तींकडून जाणून घ्या
Photo Credit; instagram
केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) प्राथमिक परीक्षा म्हणजेच प्रीलिम्स 25 मे 2025 रोजी होणार आहे.
Photo Credit; instagram
ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये होईल. पहिली शिफ्ट सकाळी 9:30 ते 11:30 आणि पुढची शिफ्ट दुपारी 2:30 ते 4:30 पर्यंत असेल.
Photo Credit; instagram
यादरम्यान दृष्टी IAS कोचिंगचे संस्थापक डॉ. विकास दिव्यकीर्ती यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.
Photo Credit; instagram
या व्हिडीओमध्ये डॉ. विकास दिव्यकिर्ती यांनी यूपीएससी (UPSC) प्रीलिम्समध्ये कोणते उमेदवार उत्तीर्ण होऊ शकतात आणि किती मार्क्स हवे असतात?, याबद्दल सांगितलं आहे.
Photo Credit; instagram
मागील दोन वर्षांचं कट-ऑफ हे 50 प्रश्न म्हणजेच 100 गुणांच्या आसपास जात असल्याचं विकास सरांनी सांगितलं.
Photo Credit; instagram
याचाच अर्थ, ज्या उमेदवारांना या पूर्व परीक्षेत म्हणजेच प्रीलिम्समध्ये 200 पैकी 100 गुण मिळतील, ते ही परीक्षा उत्तीर्ण करु शकतात. त्यांच्या मते, नेगेटिव्ह मार्किंग वगळल्यानंतर कमीत कमी 50 प्रश्नांची उत्तरे योग्य असायला हवीत.
Photo Credit; instagram
गेल्या पाच वर्षांचं कट-ऑफ (जनरल प्रवर्ग) पाहिला तर, 2020 मध्ये कटऑफ 92.5/200, तसेच 2021 मध्ये 87.54/200, 2022 मध्ये 88.22/200, तर 2023 मध्ये 75.41/200 आणि 2024 मध्ये 87.98/200 इतकं होतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
बापरे? बिपाशाचं वाढलेलं वजन पाहून थक्कच व्हाल! पॅप्ससमोर लपवला चेहरा