आता घरातून बाहेर न निघता चाला 10 हजार पावलं! जाणून घ्या टिप्स...
Photo Credit; instagram
सध्याच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे हवं तसं लक्ष देता येत नाही. ऑफिसच्या कामामधून अनेकांना जिम किंवा व्यायामासाठी वेळ मिळत नाही.
Photo Credit; instagram
त्यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवते आणि यावर उपाय म्हणून लोक उपाशी राहणं पसंत करतात. यामुळे बरेच आजार जडण्याचा धोका निर्माण होतो.
Photo Credit; instagram
बरेच लोक दररोज 10 हजार पावलं चालण्याचं टारगेट ठरवतात पण वेळ मिळत नसल्यामुळे ते पूर्ण करू शकत नाहीत.
Photo Credit; instagram
अशा लोकांसाठी घरातून बाहेर न निघता 10 हजार पावलं चालण्याच्या टिप्स आम्ही सांगणार आहोत.
Photo Credit; instagram
जर तुम्ही घरातून बाहेर पडू शकत नसाल तर घरातील बाल्कनी किंवा गच्चीमध्ये फेऱ्या मारून 10 हजार पावलं चालण्याचं टारगेट पूर्ण करू शकता.
Photo Credit; instagram
नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणानंतर काही वेळ फेऱ्या मारणं फायदेशीर ठरतं. यामुळे तुमचं टारगेट पूर्ण होईलंच त्याशिवाय पचनक्रिया आणि ब्लड सर्क्यूलेशन सुद्धा सुधारेल.
Photo Credit; instagram
हे टारगेट पूर्ण करण्यासाठी तुम्ही घरातच आवडीच्या गाण्यावर डान्स करू शकता. डान्स करणं पूर्ण शरीरासाठी चांगला व्यायाम ठरतो.
Photo Credit; instagram
ऑफिस किंवा अभ्यास करतेवळी बराच काळ एका जागी बसून आरोग्यासंबंधी समस्या होऊ शकतात. अशा वेळ एक तासभर छोटा ब्रेक घ्या आणि वॉक करा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
फक्त 'ही' 5 फळं अन्... म्हातारपण होईल दूर! कसं ते जाणून घ्या