स्कॅल्प मसाज: केस वेगानं वाढण्यासाठी जास्मिन तेलानं स्कॅल्पवर मसाज करा. यासाठी 2 ते 3 चमचे खोबरेल घ्या आणि ते गरम करा. त्यानंतर त्यात जास्मिन तेलाचे 5 ते 6 ड्रॉप्स टाकून चांगलं मिक्स करा.
Photo Credit; instagram
केसांवर तेलाने मसाज केल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटे केसांमध्ये तेल राहू द्या. त्यानंतर शॅम्पूने हे धुवून घ्या. असं आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा.
Photo Credit; instagram
हेअर मास्क: यासाठी 2 चमचे खोबरेल तेलात 5 ते 6 थेंब जास्मिन तेल टाका. यानंतर स्कॅल्प आणि केसांवर 5 ते 10 मिनिटे चांगल्यारितीने मसाज करा.
Photo Credit; instagram
हे मास्क रात्रभर तुमच्या केसांवर लावून ठेवा आणि सकाळी शॅम्पूने हे धुवून टाका. आठवड्यातून असं एकदा केल्याने तुमचे केस वेगाने वाढतील आणि स्कॅल्प हेल्दी राहील.
Photo Credit; instagram
जास्मिन तेल अॅलोव्हेरासोबत तुम्ही लावू शकता. यासाठी 2 चमचे अॅलोव्हेरा जेलमध्ये 5 ते 6 ड्रॉप्स जास्मिन तेल टाकून मसाज करा.
Photo Credit; instagram
त्यानंतर कमीत कमी 30 मिनिटे हे केसांवर राहू द्या. नंतर कोमट पाण्याने केस व्यवस्थित धुवून घ्या. चांगले परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही हे आठवड्यातून दोनदा अप्लाय करा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'Adult फिल्म करू नको', बिपाशाला असं थेट कोण बोललेलं?