प्रत्येक जण पाहील तुमच्याकडे चोरून, का? क्लिक करा म्हणजे विषय होईल क्लिअर!
Photo Credit; instagram
भारतात आता सर्वत्र कोरियन ग्लास स्किनचा ट्रेंड पाहायला मिळतोय. प्रत्येकालाच नितळ आणि चमकदार त्वचा हवी असते.
Photo Credit; instagram
मार्केटमधील बऱ्याच कॉस्मेटिक्स कंपन्या ग्लास स्किन देण्याच दावा करत असताना दिसतात. मात्र, अशा प्रोडक्ट्समुळे विपरित परिणाम देखील होऊ शकतात.
Photo Credit; instagram
नैसर्गिकरित्या, ग्लास स्किन मिळवण्यासाठी 'या' सवयींचे पालन करणे अधिक फायद्याचं ठरेल.
Photo Credit; instagram
खरंतर, रोजच्या जीवनातील सवयींमध्ये बदल केल्यामुळे नैसर्गिकरित्या अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही चमकदार आणि ग्लास स्किन मिळवू शकता.
Photo Credit; instagram
तुमचा स्ट्रेस लेव्हल मॅनेज करण्याचा प्रयत्न करा. जास्त स्ट्रेस घेतल्याने तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि अॅक्नेसारख्या समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; instagram
जर पुरेशी झोप मिळाली नाही तर चेहऱ्यावर सूज, त्वचा पिवळी पडणे आणि थकवा जाणवणे अशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे दररोज 7 ते 8 तासांची पुरेशी झोप घ्या. अशात, बेडरूममध्ये स्क्रीनचा वापर टाळा.
Photo Credit; instagram
स्मोकिंग केल्यामुळे त्वचेवर पुरळ येऊ शकतात. जेव्हा तुम्ही स्मोकिंग करता तेव्हा एपिडर्मिसच्या सर्वात बाहेरील थरांमधील लहान रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे त्वचा निस्तेज होते आणि रक्तप्रवाह कमी होतो.
Photo Credit; instagram
कोरियन ग्लास स्किनसाठी त्वचा हायड्रेटेड असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चेहऱ्याला पुरेसं हायड्रेशन तुमच्या त्वचेला अधिक कोमल आणि निरोगी बनवतं. यामुळे चेहऱ्यावरील पुरळ सुद्धा दूर होण्यास मदत होते.