महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एका ज्वेलर्सने १०५ किलो चांदीपासून गणपती बाप्पाची मूर्ती बनवली आहे.
Photo Credit; instagram
खामगाव शहरातील कमल जहांगीर या ज्वेलर्सने जालन्यातील आगळ्यावेगळ्या गणेश मंडळासाठी 105 किलो चांदीपासून गणेशमूर्ती साकारली आहे.
Photo Credit; instagram
गणेशाची ही मूर्ती अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे.
Photo Credit; instagram
मूर्तीवरील हिर्यांचं नक्षीकाम, मूर्तीच्या हातातील त्रिशूळ, कुऱ्हाड आणि मोदक यातून त्यातील सौंदर्य व्यक्त करत आहे.
Photo Credit; instagram
ही मूर्ती बनवण्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू होते, आज ही मूर्ती तयार झाली आहे.
Photo Credit; instagram
105 किलो चांदीची ही मूर्ती 90 लाख रुपयांना तयार करण्यात आल्याचे ज्वेलर्सनी सांगितले.
Photo Credit; instagram
जालन्यातील अनोका गणेश मंडळाचे सदस्य ही सुंदर मूर्ती उद्या 18 सप्टेंबर रोजी घेऊन जाणार आहेत. गणेश उत्सव संपल्यानंतर मंडळाचे सदस्य या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना करणार आहेत.
Photo Credit; instagram
याच ज्वेलर्सनी यापूर्वी अमिताभ बच्चनसाठी मुषक बनवला होता, जो अमिताभ बच्चन यांनी सिद्धिविनायक मंदिरात भेट म्हणून दिला.
प्रेग्नेंट Swara Bhaskar ला पतीने काय दिलं खास सरप्राइझ?