धनत्रयोदशीच्या दिवशी करा 'हे' खास उपाय! पैशांची कमतरता भासणार नाही अन्...
Photo Credit; instagram
दिवाळीच्या सणात धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे. आज म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जात आहे.
Photo Credit; instagram
दरवर्षी, आश्विन कृष्ण त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते.
Photo Credit; instagram
या दिवशी काही खास उपाय केल्याने चांगले लाभ मिळत असल्याचं सांगितलं जातं. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी कोणते उपाय करायला हवेत?
Photo Credit; instagram
धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्यास्तानंतर 13 दिवे लावा आणि भगवान कुबेर तसेच माता लक्ष्मीची पूजा करा.
Photo Credit; instagram
पूजा करतेवेळी चंदन, धूप, फूल आणि फळे अर्पण करा. अशातच, मंत्राचा जप केल्याने घरातील आर्थिक परिस्थिती सुधारते.
Photo Credit; instagram
याशिवाय, धनत्रयोदशी पासून दिवाळी सणाच्या प्रत्येक दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणं शुभ मानलं जातं. पूजेच्या वेळी, देवीला लवंगाची जोडी अर्पण करा.
Photo Credit; instagram
धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील तिजोरीमध्ये कमळावर विजारमान असलेल्या माता लक्ष्मीचा फोटो ठेवा. यामुळे घरात समृद्धी येते, असं मानलं जातं.
Photo Credit; instagram
या दिवशी हळद आणि तांदूळाच्या साहाय्याने घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यावर 'ॐ' चं चिन्ह बनवा. माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी हे महत्त्वाचं मानलं जातं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' मराठी अभिनेत्रीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, कोण आहे शितल करंजे?