Photo Credit; instagram

प्रत्येक पुरुषाच्या 4 बायका हव्यात! गौतम बुद्धांनी असं का म्हटलंय?

Photo Credit; instagram

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. गौतम बुद्धांचा जन्म या दिवशी झाला असल्याचं मानलं जातं. गौतम बुद्धांना भगवान विष्णूचा नववा अवतार मानले जाते.

Photo Credit; instagram

भगवान गौतम बुद्ध हे जगातील सर्वात जुन्या धर्मांपैकी एक असलेल्या बौद्ध धर्माचे संस्थापक मानले जातात. त्यांचे मौल्यवान विचार जीवनाची दिशा बदलतात आणि नवीन प्रेरणा देतात.

Photo Credit; instagram

त्यापैकी एक विचार म्हणजे पुरुषाच्या 4 बायका असणे.  गौतम बुद्धांनी म्हटले होते की प्रत्येक पुरूषाला चार बायका असाव्यात. यामागे एक रंजक कथा आहे.

Photo Credit; instagram

गौतम बुद्धांनी एकदा आपल्या शिष्यांना एक कथा सांगितली की एका पुरूषाला चार बायका होत्या. कालांतराने तो आजारी पडला आणि त्याला त्याचा मृत्यू दिसू लागला. शेवटी, त्याला खूप एकटं वाटू लागलं.

Photo Credit; instagram

त्याने त्याच्या चारही बायकांना एक एक करून बोलावले आणि विचारले, "मी तुला सर्वात जास्त प्रेम दिले, नेहमीच तुझी काळजी घेतली. आता मी मरणार आहे, मृत्यूनंतर मी जिथे जाईन तिथे तू माझ्यासोबत येशील का?"

Photo Credit; instagram

पहिल्या पत्नीने उत्तर दिले, "मला माहित आहे की तुम्ही नेहमीच माझ्यावर प्रेम केले आणि आता तुमचा अंत जवळ आला आहे. अशात, आता तुमच्यापासून वेगळे होण्याची वेळ आली आहे."

Photo Credit; instagram

दुसऱ्या पत्नीने उत्तर दिले, "तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या पहिल्या पत्नीने तुमच्यासोबत येण्यास नकार दिला, मग मी तुमच्यासोबत कशी जाऊ शकते? तुम्ही फक्त स्वार्थासाठी माझ्यावर प्रेम केले."

Photo Credit; instagram

तिसरी पत्नी म्हणाली, "मला तुमच्याबद्दल आणि स्वतःबद्दल वाईट वाटते.' म्हणून मी अंत्यसंस्कार होईपर्यंत तुमच्यासोबत राहीन. मी पुढे जाऊ शकणार नाही."

Photo Credit; instagram

चौथी पत्नी म्हणाली, "स्वामी, मी तुमच्यासोबत नक्कीच येईन. तुम्ही जिथे कुठे जाल, तिथे मी तुमच्यासोबतच राहीन आणि तुम्हाला पाठिंबा देईन. कारण मी स्वतः तुमच्यापासून दूर राहू शकत नाही."

Photo Credit; instagram

तात्पर्य असे की या कथेतील चार बायकांचं विशेष महत्त्व आहे. पहिली पत्नी म्हणजे आपले शरीर, ज्यावर आपण रात्रंदिवस प्रेम करतो आणि दुर्दैवाने आयुष्याच्या शेवटी कधीही आपल्यासोबत जात नाही.

Photo Credit; instagram

दुसरी पत्नी म्हणजे आपले भाग्य, संपत्ती, मालमत्ता, पद आणि नोकरी.  आपण आयुष्यभर या गोष्टी मिळवण्यासाठी खूप कष्ट करतो, पण आपण या जगात रिकाम्या हाताने येतो आणि मृत्यूवेळी सुद्धा आपले हात रिकामे असतात.

Photo Credit; instagram

तिसरी पत्नी म्हणजे नातेसंबंध. मृत्यूनंतर आई-वडील, बहिणी आणि भाऊ, सर्व नातेवाईक आणि मित्र, कोणीही आपल्यासोबत जात नाही.

Photo Credit; instagram

चौथी पत्नी म्हणजे आपले मन. क्रोध, लोभ आणि असंतोष हे कर्माचे नियम आहेत. आपण आपल्या कर्मापासून कधीही सुटू शकत नाही.

पुढील वेब स्टोरी

पोट फूगल्यासारखं वाटतं? मग 'हे' पदार्थ नक्की खा

इथे क्लिक करा