महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे मंत्री, आमदार-खासदार उपस्थित होते.
सर्वांनी आज (रविवारी) सह अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामचं दर्शन घेतलं. तसंच राम मंदिरात महाआरतीही केली.
त्यानंतर या नेत्यांनी नवीन राम मंदिराच्या सुरु असलेल्या बांधकामाची पाहणी केली.
यानंतर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर सडकून टीका केली.
सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते अयोध्येतील शरयू नदीच्या तीरावर विशेष महाआरती करण्यात आली.
महाराष्ट्राचे देशातील अन्य राज्यांसोबत नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहेत, त्यातही महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेचचे नाते अतुट आहे, असे शिंदे यावेळी म्हणाले.
बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने मुख्यमंत्री शिंदेंची आणखी एक घोषणा