बऱ्याचदा आपण घराची शोभा वाढवण्यासाठी घरातील भिंतीवर आरसा लावतो. मात्र, वास्तुशास्त्रानुसार, आरसा ही केवळ शोभेची वस्तू नसून ऊर्जेचा मुख्य वाहक असतो.
Photo Credit; canva
जर घरातील आरसा चुकीच्या दिशेत लावला तर घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहून तणाव, भांडणं आणि आर्थिक समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; canva
यासाठी आरसा लावताना काही खास गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक असतं. वास्तुशास्त्रानुसार, घरात आरसा लावताना कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे? याविषयी सविस्तर जाणून घ्या.
Photo Credit; canva
वास्तुशास्त्रानुसार, घरातील दक्षिण किंवा पश्चिम दिशेत आरसा लावणं टाळलं पाहिजे. या दिशेत आरसा लावल्याने नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि यामुळे घरातील सदस्यांमध्ये वाद होऊ शकतात.
Photo Credit; canva
तसेच, बेडरूममधील आरसा कधीच बेडच्या समोर किंवा अंथरुणाच्या समोर नसावा. असं न केल्यास तणाव, अस्वस्थता किंवा कौटुंबिक वाद होऊ शकतात.
Photo Credit; canva
घरातील मुख्य दरवाजा वास्तुशास्त्रानुसार अधिक शुभ मानला जातो. जर मुख्य दरवाजावर किंवा त्याच्या समोर आरसा ठेवला असेल तर तो उर्जेला घरात प्रवेश करण्यापासून रोखतो. यामुळे अशांतता आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात.
Photo Credit; canva
घरात कुठेही तुटलेला किंवा फुटलेला आरसा असेल तर तो लगेच काढून टाकावा. तुटलेली काच नकारात्मकता आणि दुर्दैवाला आमंत्रण देते.
Photo Credit; canva
वास्तुशास्त्रानुसार, ईशान्य दिशेला आरसा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. ही दिशा सकारात्मक उर्जेचा स्रोत आहे आणि येथे आरसा लावल्याने घरात सकारात्मकता आणि समृद्धी राहते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
नाद नाय करायचा! 'या' तारखेला जन्मलेले लोक चक्क IAS अधिकारी बनतात