अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरुन व्यक्तीचा मुलांक कळतो. कोणत्याही व्यक्तीच्या मुलांकावरुन त्याचा स्वभाव, भाग्य आणि यशाबद्दल रहस्य कळू शकतात.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात, कोणत्या मुलांकाचे लोक अगदी कमी वयात यश संपादन करतात? याबद्दल देखील सांगितलं गेलं आहे.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक 1 असतो. हा मुलांक सूर्य ग्रहाला प्रभावित करतो आणि हा ऊर्जा, नेतृत्व गुण आणि आत्मविश्वासाचं प्रतीक मानलं जातं.
Photo Credit; instagram
या मुलांकाचे लोक स्वतंत्र विचारांचे असतात आणि आपल्या बळावर कमी वयातच यश संपादन करतात.
Photo Credit; instagram
1 मुलांक असलेल्या व्यक्तींमध्ये जन्मत:च नेतृत्वगुण असतात. अशा लोकांमध्ये नेतृत्व करण्याची चांगली क्षमता असते.
Photo Credit; instagram
1 मुलांक असलेले लोक अत्यंत आत्मविश्वासी आणि महत्त्वाकांक्षी असतात. अशा व्यक्तींना स्वत:वर खूप विश्वास असतो आणि अवघड परिस्थितींमध्ये विचारपूर्वक आणि धैर्याने समोरे जातात.
Photo Credit; instagram
या मुलांकाचे लोक कोणत्याही आव्हानाला घाबरत नाहीत आणि आपल्या बळावर प्रत्येक समस्येचा सामना करतात.
Photo Credit; instagram
असे लोक आपलं लक्ष्य साध्य करण्यासाठी जास्त मेहनत घेतात. 1 मुलांक असलेले लोक कधीच हार मानत नाहीत.