अंकशास्त्रानुसार, मूलांक हे 1 ते 9 अंकांच्या दरम्यान असतात. प्रत्येक व्यक्तीचा मुलांक हा कोणत्या ना कोणत्या ग्रहाला प्रभावित करतो. यापैकी 8 मुलांक असलेल्या व्यक्तींवर शनि ग्रहाचा विशेष प्रभाव असतो.
Photo Credit; instagram
8 मुलांक असलेल्या व्यक्तींच्या जीवनात मोठा संघर्ष असतो. मात्र, वयाच्या 30 वर्षांनंतर त्यांना त्यांच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळतं.
Photo Credit; instagram
ज्या लोकांचा जन्म महिन्यातील 8, 17 किंवा 26 तारखेला झाला असेल, त्यांचा मुलांक 8 असल्याचं मानलं जातं. या लोकांवर शनि देवाची कृपा असते आणि कालांतराने यश त्यांच्या पदरात पडतं.
Photo Credit; instagram
अशा व्यक्तींचं जीवन सुरुवातीला मेहनत आणि संघर्षाने भरलेलं असतं. ज्यावेळी ते लोक वयाच्या 30 वर्षांपर्यंत पोहचतात, त्यावेळी त्यांची प्रगती होते आणि यशाचा मार्ग दिसू लागतो.
Photo Credit; instagram
8 मुलांक असलेल्या लोकांच्या आर्थिक संपत्तीमध्ये वाढ तर होतेच, यासोबतच त्यांना कोणत्या गोष्टींची कमतरता जाणवत नाही. कालांतराने त्यांची प्रगती होत राहते आणि हव्या त्या क्षेत्रात यशस्वी होतात.
Photo Credit; instagram
शनिचा प्रभाव असल्याकारणाने त्यांची प्रगती हळूहळू होते. मात्र, त्यांना मिळालेलं यश हे कायमस्वरूपी आणि शाश्वत राहते. एकदा यश मिळाल्यानंतर या व्यक्तींना कोणीच मागे टाकू शकत नाही.
Photo Credit; instagram
8 मुलांक असलेले लोक नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवतात. हे लोक न थकता मेहनत करत राहतात आणि सहजासहजी हार मानत नाहीत. यामुळे उशीरा का होईना पण यश त्यांच्या पदरात पडते.
Photo Credit; instagram
अशा लोकांना शिस्तबद्ध म्हणजेच आनुशासित जीवनशैली आवडते. आपलं कार्य पार पाडताना ते कधीच निष्काळजीपणा करत नाहीत. हीच शिस्त त्यांना त्यांच्या जीवनात पुढे जाण्यास कारणीभूत ठरते.