Credit: PMO, ICC, Getty

Arrow

ड्रेसिंग रुममध्ये PM मोदींनी 'या' क्रिकेटरला विचारलं,  'तू गुजराती बोलतो का?' 

Credit: PMO, ICC, Getty

Arrow

अहमदाबादमध्ये आयसीसी विश्वचषक फायनलमधील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रेसिंग रूममध्ये टीम इंडियाची भेट घेतली.

Credit: PMO, ICC, Getty

Arrow

यावेळी पंतप्रधान मोदींनी विराट कोहली-रोहित शर्मासह सर्व खेळाडूंना प्रोत्साहन दिले. पराभवानंतर खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये खूपच निराश दिसत होते.

Credit: PMO, ICC, Getty

Arrow

यावेळी PM सोबत अमित शाहा देखील होते. मोदी म्हणाले, प्रोत्साहन देत राहा, तसेच त्यांनी सर्व खेळाडूंना दिल्लीत येण्याचे निमंत्रणही दिले.

Credit: PMO, ICC, Getty

Arrow

पीएमओने जारी केलेल्या या व्हिडिओमध्ये मोदींनी प्रथम भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्याशी चर्चा केली.

Credit: PMO, ICC, Getty

Arrow

रोहित शर्माला पीएम म्हणाले- हसा भाऊ, देश तुम्हाला पाहत आहे, हे सर्व घडत असतं. यानंतर रोहित आणि विराटने आभार मानले.

Credit: PMO, ICC, Getty

Arrow

त्यानंतर पीएम मोदींनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, तुम्ही लोकांनी खूप मेहनत केली आहे.

Credit: PMO, ICC, Getty

Arrow

'क्या बाबू' म्हणत पीएम मोदींनी रवींद्र जडेजा यांची भेट घेतली, त्याच्या पाठीवर थाप मारली आणि ते गुजरातीत त्याच्याशी बोलले.

Credit: PMO, ICC, Getty

Arrow

मोहम्मद शमीशी संवाद साधताना पीएम मोदींनी शमीला मिठीही मारली आणि त्याच्या पाठीवर थाप दिली.

Credit: PMO, ICC, Getty

Arrow

यावेळी जसप्रीत बुमराहला पीएम मोदींनी विचारले की, तू गुजराती बोलतो का? त्यावर बुमराह हसला आणि म्हणाला- हो, थोडं...

Credit: PMO, ICC, Getty

Arrow

अखेर मोदींनी श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, केएल राहुल यांच्याशी चर्चा केली.

World Cup 2023: ...अन् PM मोदी Team India च्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा