Photo Credit; Getty, PTI, ICC

Arrow

कोहली खेळणार 2027 चा वर्ल्ड कप, पण रोहितसह 'या' 7 खेळाडूंचं काय?

Arrow

ऑस्ट्रेलियाने 2023 च्या विश्व चषकावर नाव कोरलं. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता बनला. 

Arrow

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव केला आणि भारताचं स्वप्न भंगले. 

Arrow

टीम इंडियातील काही खेळाडूंसाठी हा विश्वचषक शेवटच्या संधी सारखा होता, कारण पुढचा वर्ल्ड कप 2027 मध्ये आहे.

Arrow

वर्ल्ड कप 2027 दक्षिण आफ्रिका, झिब्बाम्बे, नामिबियात होणार आहे. तोपर्यंत ७ खेळाडूंचं वय वाढलेलं असेल.

Arrow

सात खेळाडूंनी फिटनेसकडे लक्ष दिलं, तर ते २०२७ च्या विश्वचषकातही खेळताना दिसू शकतात. 

Arrow

सचिन तेंडुलकर वयाच्या 40 वर्षापर्यंत, तर महेंद्रसिंग धोनी 38 व्या वर्षापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. 

Arrow

धोनी आयपीएलमध्ये खेळतो. धोनीने वयाच्या 43व्या वर्षी 2023 चा किताब चेन्नईला जिंकून दिला. 

Arrow

कोहली 35 वर्षांचा आहे. तो पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत 39 वर्षांचा होईल. फिटनेस पाहता तो खेळू शकतो. 

Arrow

कर्णधार रोहित शर्मा 36 वर्षचा आहे. मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव 33 वर्षांचे आहेत. 

Arrow

जडेजाचं वय 34 वर्ष आहे, तर केएल राहुल 31 वर्षांचा आहे. टीम इंडियात सर्वात कमी वय असलेला खेळाडू शुभमन गिल (24 वर्ष) आहे.

Arrow

आर. अश्विन 37 वर्षांचा असून, तो पुढचा वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे फिटनेस या खेळाडूंचं भवितव्य ठरवणार आहे. 

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा