Photo Credit; instagram

Mumbai: मुंबईतील 'ही' 11 आयकॉनिक ठिकाणं नक्की करा एक्सप्लोर!

Photo Credit; instagram

मुंबईचे आयकॉनिक प्रतीक म्हणजे गेट वे ऑफ इंडिया 1924 मध्ये किंग जॉर्ज V आणि राणी मेरी यांच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ बांधण्यात आले.

Photo Credit; instagram

युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रान्सपोर्ट हब आहे.

Photo Credit; instagram

आलिशान ताजमहाल पॅलेस हॉटेल हे अभिजात आणि भव्यतेचे प्रतिक आहे. गेटवे ऑफ इंडिया समोरील ही अप्रतिम वास्तुकला पाहण्यासारखी आहे. 

Photo Credit; instagram

अरबी समुद्रात बांधण्यात आलेली हाजी अली दर्गा मुंबईतील धार्मिक स्थळांपैकी एक आहे. 

Photo Credit; instagram

छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय हे मुंबईचे प्रमुख संग्रहालय आहे. यामध्ये प्राचीन शिल्पे, नाणी आणि इतिहासात नेणाऱ्या कलाकृतींचा विस्तृत संग्रह आहे.

Photo Credit; instagram

एलिफंटा लेणी हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. ही लेणी तेथील शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. 

Photo Credit; instagram

श्री सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित धार्मिक स्थळांपैकी एक आहे. दररोज हजारो भाविक येथे बाप्पाच्या दर्शनाला येतात. 

Photo Credit; instagram

माउंट मेरी चर्च हे रोमन कॅथोलिक बॅसिलिका आहे. हे सुंदर चर्च समुद्राजवळ असल्याने येथील दृश्य पाहण्यासारखे आहे. 

Photo Credit; instagram

राजाबाई क्लॉक टॉवर हे मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमधील एक प्रतिष्ठित ठिकाण आहे. सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांनी डिझाइन केलेला, टॉवर व्हेनेशियन आणि गॉथिक शैली एकत्र करतो.

Photo Credit; instagram

क्रॉफर्ड मार्केट, हे मुख्यता महात्मा ज्योतिबा फुले मंडई या नावाने ओळखले जाते. ही एक गजबजलेली बाजारपेठ आहे. 

Photo Credit; instagram

मणिभवन ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. आता हे एक संग्रहालय आहे, ज्यात गांधीजींचा वारसा जपण्यात आला आहे.

पुढील वेब स्टोरी

IAS पूजा खेडकरांची संपत्ती किती? आकडाच आलाय समोर!

इथे क्लिक करा