12th fail झालेल्या आयपीएसची कहाणी सध्या खूपच चर्चेत आहे. त्यामुळे आयपीएस अधिकाऱ्यांची ताकद आणि अधिकार पाहूनच मनोज शर्मा यूपीएससीच्या तयारीला लागले होते.
मनोज शर्मा हे उच्च पदस्थ अधिकारी असले त्यांच्या इमानदारीमुळेही ते नेहमीच चर्चेत असतात. त्यातच त्यांनी सोने आणि हिऱ्याचे दागिने न घालण्याचाही संकल्प केला आहे.
स्वतः आयपीएस अधिकारी असूनही मनोज शर्मा म्हणतात तुम्ही असं कोणतं वेगळं धनुष्य बाण सांभाळताय असाही ते सवाल करतात.
मनोज शर्मा आपल्याच खात्यातील अधिकाऱ्यांना ते कानमंत्र देतात तेव्हा मात्र अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो.
मनोज शर्मा आपल्या अधिकार पदाविषयी बोलताना सांगतात की, सरकार आयपीएस अधिकाऱ्यांना कार देते आणि त्या सोबत 2 ड्रायव्हरदेखील देत असते.
सरकारने आयपीएसला दिलेले घर इतके मोठे आहे की त्याचे भाडेही 5 ते 6 लाख रुपये आहे.
आयपीएसला घरात काम करण्यासाठी माणसं दिली जातात, तर त्यांच्या सुरक्षिततेची काळजी सरकार घेत असते.
मनोज शर्मा हे ही सांगतात की, सरकारकडून सोय करून दिल्यामुळे मला स्वतःला पेट्रोल आणि डिझेलचे काय भाव आहेत तेही मला माहिती नाही.
आयपीएस अधिकाऱ्यावर सरकार दर महिन्याला अंदाजे 7 ते 8 लाख रुपये खर्च करत असते.
मनोज शर्मा सांगतात की, 'आमचा पगार कमी आहे असं आम्ही म्हणत असलो तरी पगार अधिक असला तरी आमचं पोट कधीच भरणार नाही.'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
सकारात्मक मानसिकतेसाठी गौर गोपाल दास यांचे Top 10 Quotes!