Photo Credit; instagram

Lalbaugcha Raja 2024: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!

Photo Credit; instagram

गणेशोत्सवाची चाहूल लागली की लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांमध्ये पाद्यपूजनाच्या सोहळ्याचे वेध लागतात. 

Photo Credit; instagram

पाद्यपूजनाच्या सोहळ्यानंतर मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरूवात होते. त्यामुळे या सोहळ्याचं विशेष महत्त्व आहे.

Photo Credit; instagram

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा लालबागच्या राजाचे 91 वे वर्ष आहे.  

Photo Credit; instagram

अशावेळी आज मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजता गणेश मुहूर्त पूजन संपन्न झाले. 

Photo Credit; instagram

मंडळाचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तीकार कांबळी आर्ट्सचे श्री.रत्नाकर मधुसुदन कांबळी यांच्या शुभहस्ते हे पाद्य पूजन पार पडले.

Photo Credit; instagram

त्याचबरोहर खजिनदार श्री.मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकांचे पूजन केले.

Photo Credit; instagram

हा पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Photo Credit; instagram

आतापासून गणेशोत्सवाच्या सर्व तयारीस सुरुवात झाली असून आता आतुरता फक्त बाप्पाच्या आगमनाची आहे.

पुढील वेब स्टोरी

'द ट्रायल' फेम अभिनेत्रीची आत्महत्या, इंस्टाची 'ती' पोस्ट प्रचंड होतेय व्हायरल! 

इथे क्लिक करा