Arrow

200 लोकांना यमसदनी धाडणारी महाभयंकर महिला शिक्षिका...

Arrow

दुसऱ्या विश्व युद्धाच्या दरम्यान 1941 मध्ये जपानच्या सेनेने फिलिपीन्सच्या अनेक भागांवर कब्जा केला होता.

Arrow

जपानी सेनेने यावेळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाच माफ केले नव्हते.ते महिलांना सर्वांधिक टॉर्चर करायचे.

Arrow

फिलिपीन्सच्या एका स्कुल टीचरने या जपानी सैन्याविरूद्ध लढण्याचा निर्णय़ घेतला. तिने स्वत:चा एक 110 जणांचा ग्रुप तयार केला होता.

Arrow

या ग्रुपची लीडर स्कुल टीचर नीव्स फर्नाडेस होती. तर ग्रुपचे नाव गोरिला ग्रुप होते. 

Arrow

या ग्रुपने जपान सैन्याविरूद्द लढण्यासाठी गोरीला टेकनिकचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता.

Arrow

गोरीला टेकनिकमध्ये ही लोक जंगलात लपून जपानी सैनिकांना मारायचे. तीन वर्ष त्यांनी जपानच्या अनेक सैनिकांना मारले होते.

Arrow

नीव्स फर्नाडेसने तर एका चाकूच्या जोरावर 200 जपानी सैनिकांना एकटीने मारले होते. या महिलेला जपानी सैन्य देखील घाबरायचे.

Arrow

नीव्स फर्नाडेसना पकडून आणणाऱ्यांना 10 हजार पाऊंडचे बक्षिस जाहिर करण्यात आले होते. पण जपानी सैनिक तिला कधीच पकडू शकले नाहीत.

Arrow

नीव्सने तिच्या गोरीला ग्रुपद्वारे फिलीपीन्सच्या अनेक भागांना आझाद केले होते. यासोबतच जपानी सैनिकांच्या तावडीतून अनेक महिलांची सुटका केली होती.

Arrow

दुसऱ्या विश्व युद्धात जेव्हा जापानचा पराभव झाला तेव्हा अनेक इंटरनेशनल चॅनेल्सनी तीची मुलाखत घेतली होती. 

बिस्कीटांना छिद्र का असतात? काय आहे वैज्ञानिक कारण? 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा