Photo Credit मुंबई tak

Arrow

बाप रे! कल्याणमध्ये घरात किंग कोब्राचा मुक्काम, फोटो पाहून तुम्हालाही फुटेल घाम

Arrow

कल्याण येथील वडवली गावत राहणार्‍या दुर्गेश झा यांच्या घरात भला मोठ्या नागाचे दर्शन घडले.

Arrow

घरात नाग शिरल्याने घरातील लोकांचा गोंधळ उडाला होता. 

Arrow

अशा स्थितीत स्थानिक नागरिकांनी वॉर फाऊंडेशनला संपर्क साधून याबाबत माहिती दिली. 

Arrow

सर्पमित्र रोमेश यादव आणि प्रतीक पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांसह या नागाचा बचाव केला. 

Arrow

हा नाग ब्लॅक कोब्रा असून मध्य प्रदेश, राजस्थान ह्या भागात जास्त प्रमाणात आढळतो. 

Arrow

कल्याणमध्ये हा ब्लॅक कोब्रा आढळल्याने सर्प मित्रांना नवलच वाटले. 

Arrow

सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा व इतर भागातून गारुडी हे नाग महाराष्ट्रात आणतात.'

Arrow

'नागाच्या विष ग्रंथी काढून किंवा तोंड शिवून अवैधरीत्या हे नाग घेऊन महाराष्ट्रात खेळ दाखवतात किंवा धार्मिक गोष्टींचा आढावा देऊन पैसे कमवतात.'

Arrow

'हे नाग जास्त दिवस जगत नाही यामुळे परत जाताना गारुडी नाग येथेच सोडून जातात. हा नाग असाच असावा.'

Arrow

वॉर फाऊंडेशनचे सर्पमित्र रोमेश यादव यांनी ही माहिती दिली. तसेच, बचाव केलेला नाग वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला.

Sonali Kulkarni : मराठी अभिनेत्री सोनाली दाक्षिणात्य चित्रपटात, दिग्गज अभिनेत्यासोबत झळकणार

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा