Photo Credit; instagram

Arrow

आलियाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, Kangna Ranaut ची व्हायरल प्रतिक्रिया..

Photo Credit; instagram

Arrow

RRR, पुष्पा, गंगुबाई काठियावाडी आणि मिमी हे चित्रपट 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चर्चेचा विषय ठरले.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी आलिया भट्ट आणि क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री कंगना राणौतच्या थलायवी या चित्रपटाला कोणत्याही श्रेणीत पुरस्कार मिळालेला नाही. यामुळे तिची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवण्याची संधी हुकली.

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची घोषणा झाल्यानंतर कंगनाने इंस्टा स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट लिहिली. तिने सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.

Photo Credit; instagram

Arrow

कंगनाने लिहिलं, 'राष्ट्रीय पुरस्कार हा एक आर्ट कार्निव्हल आहे, जो देशातील सर्व कलाकारांना एकत्र आणतो. सर्व भाषांमध्‍ये होत असलेल्‍या अद्‍भुत कार्याला ओळख मिळणे जादुई आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'तुमच्यापैकी ज्यांना माझ्या थलायवी चित्रपटाला एकही पुरस्कार मिळाला नाही याचं दुःख आहे त्यांनी जाणून घ्या की कृष्णाने मला काय दिलं आणि काय दिलं नाही याची मी आभारी आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'तुमच्यापैकी जे माझ्यावर खूप प्रेम करतात आणि कौतुक करतात त्यांनाही हा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. कला व्यक्तिनिष्ठ असते. मला खात्री आहे की ज्युरीने सर्वोत्तम कामगिरी केली. मी सर्वांना शुभेच्छा देते.'

Photo Credit; instagram

Arrow

कंगनाचा थलायवी हा चित्रपट २०२१ मध्ये आला होता. यामध्ये तिने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

100 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने विशेष कलेक्शन केले नाही. थलायवीला संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

Photo Credit; instagram

Arrow

कंगना यावेळी पुरस्कार जिंकण्यापासून हुकली असेल, पण तिला फॅशन, क्वीन, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका या ४ चित्रपटांसाठी पुरस्कार मिळाला आहे. 

Ameesha Patel ची सलमान-सनीप्रमाणे आहे 'ही' अट! इंटीमेट सीनसाठी..

पुढील वेब स्टोरी