Photo Credit; instagram

Arrow

Bail Pola 2023 : महादेवाच्या मंदिरात नंदी बाहेर का बसलेला असतो?

Photo Credit; instagram

Arrow

आज संपूर्ण महाराष्ट्रात बैलपोळ्याचा सण अगदी उत्साहात साजरा केला जात आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

शेतकरी त्यांच्या मित्राच्या (बैल) योगदानासाठी कृतज्ञता व्यक्त करत हा सण साजरा करतात. 

Photo Credit; instagram

Arrow

आपण शेतकऱ्याचा मित्र तर पाहिला पण महादेवाच्या मंदिरातही आपल्याला नंदी बाहेर बसलेला दिसतो. त्याचं महत्त्व काय हे तुम्हाला माहितीये का?

Photo Credit; instagram

Arrow

खरं तर ही शिलाद नावाच्या एका मुनींची कहाणी आहे. ज्यांनी वंशासाठी इंद्राकडे पुत्रप्राप्तीची मागणी केलेली असते.

Photo Credit; instagram

Arrow

पण इंद्र शिलाद मुनींना शंकराची आराधना करा तुमची इच्छा पूर्ण होईल असं सांगतात. ते तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करतात आणि आपली इच्छा सांगतात.

Photo Credit; instagram

Arrow

ही इच्छा पूर्ण होईल असं महादेव सागंतात. एकेदिवशी शिलाद मुनींना रस्त्यात एक गोरं गोमटं बाळ सापडतं. यावेळी आकाशवाणी होते आणि त्याचा सांभाळ करण्यास सांगितलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

शिलाद मुनी त्याला स्वीकारतात आणि त्याचं नाव नंदी ठेवतात. तो अतिशय हुशार आणि आज्ञाकारी असतो. एकेदिवशी आश्रमात दोन साधू येतात.

Photo Credit; instagram

Arrow

या साधूंच्या सेवेची जबाबदारी शिलाद मुनी नंदीला देतात. तो ती व्यवस्थितपणे पार पाडतो. जाताना ते साधू शिलाद मुनींना शतायुषी भव: असा आशीर्वाद देतात पण नंदीला देताना के कचरतात.

Photo Credit; instagram

Arrow

हे पाहून शिलाद मुनी साधूंना याचं कारण विचारतात. तेव्हा ते म्हणतात नंदीचं आयुष्य कमी आहे. हे ऐकून मुनींना रडू कोसळतं.

Photo Credit; instagram

Arrow

पण नंदीला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा तो हसतो. आणि म्हणतो, तुम्हाला साक्षात महादेवांना आशीर्वाद दिले ना? मग मी पण त्यांना प्रसन्न करतो त्यांच्याकडून आयुष्य मागतो.

Photo Credit; instagram

Arrow

नंदी हुशारीने महादेवाला प्रसन्न करतो. पण त्यांचं विराट रूप पाहून त्याला काही मागण्याची इच्छाच होत नाही. तो फक्त म्हणतो की, 'मला तुमच्याजवळ कायम राहयचं आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

हे ऐकून महादेव म्हणतात, 'माझा बैल मरण पावला आहे. तू त्याच्या जागेवर आजपासून राहशील. माझं वाहन बनशील.' अशाप्रकारे नंदी नंदेश्वर झाला.  

Bail Pola 2023 : बैलपोळा का साजरा करतात, पौराणिक कथा काय?

पुढील वेब स्टोरी