Photo Credit; instagram

Arrow

'हे' बॉलिवूड सेलिब्रिटी जे मुलं असूनही अनाथांचे झाले 'मायबाप'

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येक आई-वडिलांवर एक मोठी जबाबदारी असते ती त्यांच्या मुलांची. कोणत्याही मुलाची जबाबदारी घेणं, त्याला शिकवणं आणि सक्षम बनवणं हे सोपे काम नाहीये.

Photo Credit; instagram

Arrow

पण असे अनेक सेलेब्स आहेत ज्यांनी केवळ आपल्या मुलांची जबाबदारीच घेतली नाही तर मुले दत्तक घेऊन त्यांना चांगले आयुष्य दिले.

Photo Credit; instagram

Arrow

सनी लिओनी तीन मुलांची आई आहे. तिने आणि पती डॅनियलने 2017 मध्ये महाराष्ट्रातील लातूरमधील 21 महिन्यांच्या निशाला दत्तक घेतलं. नंतर ते, 2018 मध्ये सरोगसीद्वारे पुन्हा जुळ्या मुलांचे पालक झाले.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री सुष्मिताने 2000 मध्ये एका मुलीला दत्तक घेतले, तिचे नाव तिने रिनी ठेवले. 10 वर्षांनंतर तिने अलिसा नावाची दुसरी मुलगी दत्तक घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडननेही 1995 मध्ये लग्नाआधी 2 मुलींना दत्तक घेतलं. लग्नानंतर तिने एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला. रवीनाच्या दत्तक घेतलेल्या मुलींचं आता लग्नही झालं आहे आणि ती आजी झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता सलमान खानचे वडील आणि पटकथा लेखक सलीम खान यांनीही अर्पिता खानला दत्तक घेतलं होतं. ती सर्वांची लाडकी आहे आणि तिला दोन मुलंही आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मिथुन चक्रवर्ती यांनीही एक मुलगी दत्तक घेऊन तिचे नाव दिशानी ठेवले. त्यांना स्वत:ला  तीन मुलं आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मंदिरा बेदीनेही गेल्या वर्षी खुलासा केला की तिने पाच वर्षांची मुलगी दत्तक घेतली आहे. तिचं नाव तारा बेदी कौशल ठेवलं आहे.

Malaika Arora च्या प्रेग्नेंसीवरून अर्जुन भडकला! कारण..

पुढील वेब स्टोरी