बॉलीवूडच्या 'या' अप्सरांचे प्रचंड महागडे आउटफिट, किंमत ऐकूनच व्हाल हैराण!
बॉलिवूडमधील अभिनेत्री त्यांच्या ग्लॅमरस लुक आणि फॅशनेबल स्टाईलसाठी ओळखल्या जातात.
खासगी ट्रीपपासून ते प्रमोशनल इव्हेंट्सपर्यंत, बॉलिवूडच्या या दिवा एकापेक्षा एक जबरदस्त ड्रेस परिधान करत असतात.
अभिनेत्रींच्या काही ड्रेसेसची किंमत तर लाखो-कोटी रुपयांमध्ये आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या या महागड्या स्टायलिश ड्रेसबद्दल चला तर मग जाणून घेऊया.
उर्वशी रौतेलाने दुबईत एका चित्रपटासाठी सोन्याचा ड्रेस घातला होता. त्या ड्रेसची किंमत जवळजवळ 37 कोटी रुपये होती.
प्रियांका चोप्राने ग्रॅमी अवॉर्ड्स 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय लेबल राल्फ आणि रुसोने डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. त्याची किंमत 77 लाख रुपये होती.
उर्वशी रौतेलाने इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमजानसोबत व्हिडीओसाठी नेव्ही ब्लू रंगाचा ड्रेस परिधान केला होता. ज्याची किंमत 15 कोटी रुपये आहे.
दीपिका पदुकोणचा हा गाऊन झॅक पोसेन यांनी डिझाइन केला होता. तो जीई अॅडिक्टिव आणि प्रोटो लॅब्सच्या प्लास्टिक नक्षीच्या तुकड्यांपासून बनवला होता. ज्याची किंमत सुमारे 50 लाख होती.
IIFA 2018 च्या रेड कार्पेटवर आलिया भट्टने 23 लाखांचा ग्लिटर झुहेर मुराद गाऊन परिधान केला होता.