Photo Credit; instagram

Arrow

Ekta Kapoor ने फाडला स्मृती इराणींचा तो करार, म्हणाली, 'मी ती टेप पाहिली अन्...'

Photo Credit; instagram

Arrow

टीव्ही इंडस्ट्री क्वीन एकता कपूरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत तिच्या प्रवासाविषयीही सांगितले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एकताने तिची लोकप्रिय मालिका 'क्यू की सास भी कभी बहू थी'चा टाइटल ट्रॅक पोस्ट केला आणि तिचा प्रवास कसा सुरू झाला ते सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

एकताने लिहिलं, '1994 साली मी माझी मैत्रीण शबीनाच्या घरी होते आणि पंडित जनार्दन माझे फेस रीडिंग करत होते. त्यांनी मला सांगितले की मी लवकरच माझी कंपनी सुरू करणार आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

मी त्यांना सांगितले, 'ऑगस्टमध्ये कंपनी सुरू करण्याची माझी योजना आहे. यानंतर पंडित मला म्हणाले की सर्व काही ठीक होईल पण तू 25 वर्षांची होईपर्यंत थांब.'

Photo Credit; instagram

Arrow

'मग असा शो करशील की, त्याला लोकांची भरभरून पसंती मिळेल.' नंतर तिने क्यू की सास भी कभी बहू थी हा कार्यक्रम केला.

Photo Credit; instagram

Arrow

याबाबत एकताने स्मृती इराणीच्या कास्टिंगबद्दलही खुलासा केला. या मालिकेत स्मृतीने तुलसीची मुख्य भूमिका साकारली होती.

Photo Credit; instagram

Arrow

एकताने लिहिलं, 'मार्च 2000 मध्ये मी हिंदी मालिका सुरू केली आणि एका नवीन मुलीला एका दिवसाच्या भूमिकेसाठी कास्ट केलं. पण तिची टेप पाहून मी एक दिवसाचा करार फाडला आणि तिला मालिकेत मुख्य भूमिकेत घेतलं.'

Photo Credit; instagram

Arrow

'विशेष म्हणजे त्या दिवशी तिचा वाढदिवस होता. असे म्हणत एकताने स्मृती इराणींना टॅग केलं. स्मृती ही नवीन मुलगी होती, जिचा करार एकताने फाडला होता.'

Photo Credit; instagram

Arrow

एकताच्या या पोस्टवर स्मृतींनीही कमेंट केली आहे. त्यांनी लिहिलं,'इतकं प्रेम आणि आदर दिल्याबद्दल धन्यवाद.'

अजित पवार विरुद्ध शरद पवार वाद पेटला! रोहित पवारांची सडकून टीका

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा