10 वर्षांनी मोठ्या सैफसोबत कशी सुरूये करिनाची मॅरेज लाईफ?
Photo Credit; instagram
करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेलं कपल आहे. करीना-सैफच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना थक्क केलं होतं.
Photo Credit; instagram
नुकत्याच एका मुलाखतीत करिनाने सैफसोबतच्या तिच्या रिलेशनबद्दल आणि बॉन्डबद्दल सांगितले.
Photo Credit; instagram
ती म्हणाली, 'आम्हाला एकमेकांसोबत आणि एकमेकांच्या जवळ राहायला आवडते. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सुखी वैवाहिक जीवनाचे कोणतेही रहस्य नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम.'
Photo Credit; instagram
'सैफ नेहमी म्हणतो, आपण एकमेकांना जास्तीत जास्त आवडलं पाहिजे. आम्हाला एकमेकांशी बोलणे, एकमेकांच्या जवळ असणे आवडते.'
Photo Credit; instagram
'माझ्यासाठी तो जगातला माझा आवडता माणूस आहे. मी मित्र किंवा इतर लोकांसोबत वेळ घालवण्याचा विचार करत नाही, कारण सैफ आणि मला एकमेकांची कंपनी आवडते.'
Photo Credit; instagram
'मला वाटतं हेच नातं पुढे घेऊन जातं. मला पुन्हा एकदा पतीसोबत चित्रपटात काम करायचं आहे. मी सैफसोबत काम करत नाही.'
Photo Credit; instagram
'तो एक उत्तम अभिनेता आहे. पण तो नेहमी म्हणतो, मला माहीत नाही की आपण एकत्र काम करू शकू की नाही.'
Photo Credit; instagram
करिनाबद्दल बोलायचं झाले तर ती नुकतीच नेटफ्लिक्सच्या जाने जान या चित्रपटात दिसली होती. यात तिच्या अभिनयाला खूप पसंती मिळाली.
लग्नानंतर परिणीती चोप्रा मुंबई सोडून जाणार? कारण...