परिणीती-राघवचा विवाह ठरणार भव्यदिव्य, अरदास कार्यक्रमाने होणार प्रारंभ
परिणीती-राघव यांच्या लग्नाला अवघे काही दिवसच राहिले आहेत. 17 सप्टेंबरपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे.
राघव आणि परिणीतीच्या लग्न सोहळा भव्य दिव्य आहे, तसाच तो वेगवेगळ्या शहरात होणार आहे.
भव्य दिव्यतेमुळे जसं हे लग्न चर्चेत आले आहे, तसेच हे लग्न अरदासमुळे लक्षवेधी ठरणार आहे. अरदासनंतर दोन्ही कुटुंबीयांचीही भेट होणार आहे.
अरदास कार्यक्रमानंतर वधू-वर आणि कुटुंबीय उदयपूरसाठी रवाना होणार. उदयपूरमध्ये 23 सप्टेंबरपासून या विवाहसमारंभ होणार आहे.
कुटुंबीयांच्या गाठीभेटीनंतर या दोघांबरोबरच लग्नातील पाहुण्यांचे स्वागत होणार आहे. त्या कार्यक्रमाला ग्रेन्स ऑफ लव्ह असं नाव देण्यात आले आहे.
उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये हा सोहळा होणार आहेत. हा विवाह सोहळा 24 सप्टेंबर रोजी ताजच्या भव्यदिव्य सेटवर होणार आहे.
या लग्नातील प्रत्येक गोष्टीत एक वेगळी रंगत आहे. परिणीतीच्या लग्नाचा ड्रेस तयार असून राघव यांचाही तयार होत आहे.
विवाहानंतर दोघंही चंदीगड आणि दिल्लीत रिसेप्शन करणार आहेत. परिणीती-राघव यांची 13 मे रोजी एंगेजमेंट झाली होती. त्यावेळीही बड्या लोकांनी हजेरी लावली होती.