2027 पर्यंत 'या' राशींना शनीचा होणार अधिक फायदा, कधीही रिकामे राहणार नाहीत खिस्से

मुंबई तक

27 May 2025 (अपडेटेड: 27 May 2025, 11:45 AM)

Astrology 2025 : शनीने मीन राशीत प्रवेश केल्याने त्याचा परिणाम हा इतर राशींवर होणार आहे. त्या इतर राशींवरील शनीदेवाची कृपादृष्टी 2027 पर्यंत राहिल. यामुळे अशा राशीतील लोकांना अर्थिल लाभ मिळणार आहे.

follow google news
Astrology

1/6

ज्योतिषशास्त्रानुसार, शनीने मीन राशीत प्रवेश केलेला आहे. काही राशींसाठी हा बदल अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभ असणार आहे. शनीची हालचाल बऱ्यापैकी मंदावणार आहे. शनीच्या मीन राशीतील प्रवेशामुळे काही राशींना चांगला फायदा होईल. यामुळे  धन, संपत्ती, यश आणि समृद्धी लाभणार आहे. अशा नेमक्या कोणत्या राशीत आहेत हे जाणून घेऊयात. 

Astrology

2/6

मीन राशी

29 मार्च रोजी मीन राशीत शनीचा प्रवेश झाला आहे.  2027 पर्यंत तसाच राहणार असून शनीची साडेसाती काही राशींवर परिणामकारक राहिल. पण ज्या राशींमध्ये शनीने प्रवेश केला त्या राशींना त्याचा चांगला लाभ होणार आहे. यामुळे, धन, दौलत आणि करिअरच्या चांगल्या संधी निर्माण होणार आहे. 

Astrology

3/6

मीन राशीत शनीचा प्रवेश

मीन राशीच्या पहिल्या घरात शनिच्या प्रवेशामुळे तुम्हाला आत्मविश्वास आणि समृद्धी प्राप्त होईल. मीन राशीच्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि व्यवसायात चांगली वाढ निर्माण होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. अविवाहितांना लग्नाचे योग जुळून येणार आहेत. 

Astrology

4/6

तूळ राशी

तूळ राशीत शनि हा सहाव्या स्थानी असणार आहे. या राशीचे लोक त्यांच्या विरोधकांवर विजय मिळवतील. यामुळे आरोग्य सुधारणार आहे. नोकरी करणाऱ्यांना सहकार्यांकडून चांगलं सहकार्य मिळेल. व्यवसायात नफा वाढणार आहे. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघडतील. कर्ज फेडण्यासाठी हा काळ चांगला सकारात्मक आहे. 
 

Astrology

5/6

मिथून राशी 

मिथून राशीत शनीचे भ्रमण दहाव्या स्थानी होणार आहे. हा करिअर आणि आदराचा प्रश्न निर्माण होत आहे. या राशींच्या लोकांना नोकरीत पदोन्नती मिळू शकते. तसेच नोकरदारांच्या पगारात चांगली वाढ होणार आहे. दरम्यान, व्यवसायात चांगला फायदा होईल. उर्वरित खोळंबलेली कामं लवकरच पूर्ण होतील. 

Astrology

6/6

शनीची करा भक्ती

शनीचा प्रभाव वाढवण्यासाठी काही साधेसोपे उपाय करावे लागणार आहेत. शनिवारी काळे तीळ आणि मोहरीचे तेल शनिदेवाला अर्पण करावे. तसेच हनुमान चालीसा पठण करावी. तसेच गरीबांना अन्नदान करावे, असे केल्यास आपल्याला यश मिळेल. 
 

हे वाचलं का?
follow whatsapp