शनीच्या भ्रमणामुळे 'या' लोकांवर पडणार पैशांचा पाऊस, आजपासून 'काही' राशीतील लोकांचे बदलणार भाग्य
मुंबई तक
20 Jan 2026 (अपडेटेड: 20 Jan 2026, 01:54 PM)
ASTROLOGY : शनि ग्रहाचे नक्षत्र हे 20 जानेवारी रोजी होणार आहे. याच दिवशी शनी ग्रह हा दुपारी 12.13 वाजेच्या दरम्यान त्याच्याच मालकीच्या उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राच्या संक्रमणाचा विशेषतः काही राशींसाठी लोकांवर सकारात्मक परिणाम होऊन नशीब पालटण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

1/5
शनि ग्रहाचे नक्षत्र हे 20 जानेवारी रोजी होणार आहे. याच दिवशी शनी हा दुपारी 12.13 वाजेच्या दरम्यान त्याच्याच मालकीच्या उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राच्या संक्रमणाचा विशेषतः काही राशींसाठी महत्त्वाच्या बाबी निर्माण होण्याची शक्यता आहे.

2/5
ज्योतिषशास्त्रानुसार, शनीचे प्रत्येक संक्रमण जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणते. जेव्हा शनी ग्रह हा आपले नक्षत्र आणि राशी बदलताना दिसतो तेव्हा त्याचा परिणाम हा काही राशींवर होताना दिसतो. याच काही राशींपैकी खालीलप्रमाणे तीन राशी नमूद करण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT

3/5
मिथुन:
मिथुन राशीत शनी ग्रहाच्या संक्रमणाचा परिणाम बघायला मिळेल. नशिबाची साथ असून रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक समस्या सुटून अर्थव्यवहार चांगला राहील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगले पॅकेज मिळू शकते. अनावश्यक खर्च कमी होतील. वडिलोपार्जित मालमत्तेतूनही फायदा होण्याची दाट शक्यता आहे.

4/5
कर्क :
शनीचे भ्रमण हे कर्क राशीसाठी खूप शुभ संकेत देणारं ठरणार आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

5/5
मकर :
मकर राशीतील लोकांना शनीचे विशेष आशीर्वाद मिळत राहतील. उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी कळेल.
ADVERTISEMENT










