ग्रहण दोष योग लागू झाल्याने 'या' राशीतील लोकांना आर्थिक चणचण भासेल, तुमच्याही राशीचा समावेश आहे का?
मुंबई तक
• 09:32 AM • 18 Jul 2025
Astrology : 13 जुलैपासून ग्रहण दोष लागू झाल्याने एकूण तीन राशीतील लोकांना आर्थिक समस्या निर्माण होणार आहे. अशा नेमक्या कोणत्या तीन राशी आहेत ते जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT


1/5
ग्रहण दोष : ज्योतिषशास्त्राने दिलेल्या माहितीनुसार, 13 जुलैपासून ग्रहण दोष लागू झाल्याने एकूण तीन राशीतील लोकांना आर्थिक समस्या निर्माण होणार आहे. अशा नेमक्या कोणत्या तीन राशी आहेत ते जाणून घेऊयात.


2/5
राहू आणि चंद्राची युती कुंभ राशीत झाली आहे, ज्यामुळे एक विशेष ग्रहण दोष निर्माण होईल, असे ज्योतिषशास्त्रांनी सांगितलं आहे. यामुळे काही राशीतील लोकांच्या आयुष्यात अशांतता निर्माण होईल अशी माहिती ज्योतिषशास्त्राने दिली आहे. याचा विपरीत परिणाम हा तीन राशीतील लोकांवर होणार असून त्या नेमक्या कोणत्या तीन राशी आहेत ते जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT


3/5
सिंह राशी
सिंह राशीतील लोकांचं ग्रहण हे सातव्या स्थानावर होत आहे, असे ज्योतिषशास्त्र सांगतं. यामुळे सिंह राशीतील लोकांच्या जीवनात कौतंबिक वाद आणि सामाजिक अंतर निर्माण होते. अचानकपणे खर्च वाढतो आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.


4/5
कुंभ राशी
या दोष योगामुळे कुंभ राशीतील लोकांच्या जीवनात याचा नकारात्मक परिणाम जाणवेल. यामुळे नोकरीत अस्थिरता जाणवेल आणि वरिष्ठांशी मतभेद निर्माण होतील. तसेच वाहनचालकांसाठी धोका निर्माण होईल.
ADVERTISEMENT


5/5
धनु राशी
धनु राशीतील लोकांसाठी हा योग तिसऱ्या घरात तयार होताना दिसत आहे. त्यामुळे दोन्ही भावंडांपासून दूर होण्याची आणि लपलेले शत्रू पुन्हा हल्ला करण्याची भिती आहे. तसेच आपल्या महत्वाच्या कामांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
