Astrology : त्रिपुष्कर योग 2026, 'या' राशीचे भाग्य खुलणार

मुंबई तक

• 12:35 PM • 07 Jun 2026

Astrology : शुभ आणि फलदायी योग त्रिपुष्कर योग 16 जून रोजी तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रात हा योग अत्यंत विशेष मानला जातो, कारण याच काळात केलेल्या कर्माचे फळ दुप्पटीने मिळते. हा योग काही राशींना प्रगती, समृद्धी आणि धन मिळवून देईल अशी अपेक्षा आहे. 

follow google news
Astrology

1/5

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची हालचाल आणि नक्षत्रांची स्थिती अनेक दुर्मिळ योगायोग घडवून आणते, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची दिशाभूल बदलून टाकणारी आहे, अशातच अत्यंत शुभ आणि फलदायी योग त्रिपुष्कर योग 16 जून रोजी तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रात हा योग अत्यंत विशेष मानला जातो, कारण याच काळात केलेल्या कर्माचे फळ दुप्पटीने मिळते. हा योग काही राशींना प्रगती, समृद्धी आणि धन मिळवून देईल अशी अपेक्षा आहे. 
 

Astrology

2/5

मेष

यामध्ये पहिली राशी ही मेष आहे. हा काळ मेष राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी आहे. याच काळात तुम्ही जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवू शकता. ज्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील, आपली आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल. तसेच मानसिक ताण तणाव होईल आणि हा काळ तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असेल. 
 

Astrology

3/5

सिंह 

सिंह राशीच्या संयोगामुळे करिअरमध्ये मोठी चालना मिळणार आहे. नोकरादर वर्गाला कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळेल, तसेच व्यवसायिकांना एखादा मोठा करार मिळण्याची शक्यता असते. समाजात कामाच्या ठिकाणी आदर वाढेल. 
 

Astrology

4/5

कन्या 

कन्या राशीतील लोकांना 16 जूनपासून सुवर्ण संधी मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण, लेखन, संशोधन किंवा कोणत्याही बैद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रतिभा टिकवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळेल. 
 

Astrology

5/5

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी त्रपुष्कर योग निर्माण त्यांच्या नशिबातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आर्थिक अडचणी दूर होतील, कर्जाचे मार्ग खुले होतील. वडिलोपार्जित मालमत्तेतून संपत्तीचा वाटा मिळेल. कुटुंबात उत्सहाचे वातावरण आहे. 
 

हे वाचलं का?
follow whatsapp