सप्टेंबर महिन्यातील 'या' तारखेपासून ग्रहण योग, काही राशींना मिळणार धोका, काय सांगतं राशीभविष्य?
मुंबई तक
• 09:40 AM • 02 Sep 2025
Grahan Yog Astrology : 6 सप्टेंबरपासून ग्रहांच्या हालचालीचा मानवी युतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. कारण 6 सप्टेंबर रोजी चंद्र ग्रह हा कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याच ठिकाणी राहूची आधीच उपस्थित आहे. या दुर्मिळ योगायोगामुळे 18 वर्षांनंतर कुंभ राशीत ग्रहण योग निर्माण होईल.
ADVERTISEMENT


1/5
ज्योतिषशास्त्रानुसार, 6 सप्टेंबरपासून ग्रहांच्या हालचालीचा मानवी युतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. कारण 6 सप्टेंबर रोजी चंद्र ग्रह हा कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याच ठिकाणी राहूची आधीच उपस्थित आहे. या दुर्मिळ योगायोगामुळे 18 वर्षांनंतर कुंभ राशीत ग्रहण योग निर्माण होईल.


2/5
या ग्रहण योगाचा परिणाम हा सर्व राशींवर होणार आहे. पण विशेष करून मीन, सिंह आणि तूळ राशीवर चांगला परिणाम होण्याची चिन्हे आहेत. यामुळे या तीन राशींना सावधानता बाळगावी असे ज्योतिषशास्त्र सांगतं.
ADVERTISEMENT


3/5
तूळ राशी :
गोचर कुंडलीच्या सहाव्या घरात ग्रहण योग तयार होईल. काही शत्रू हे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. कामात अडथळा येऊ शकतो आणि अर्थात बाबींमध्ये चढ उतार होण्याची शक्यता आहे. आरोग्य जपावे, विशेषनाजे पोट आणि त्वचेची काळजी घ्या.


4/5
सिंह राशी :
सिंह राशीसाठी आठव्या घरात ग्रहण योग तयार होईल, जो आरोग्य आणि कार्यक्षेत्रासाठी आव्हानात्मक असू शकतो. सर्दी, ताप किंवा विषाणूजन्य संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. तीच कामाच्या ठिकाणी काळजी घ्यावी. कारण तुमचे सहकारी आणि इतर मंडळी तुमच्या कामावर लक्ष ठेवून असतील. नोकरी बदलत असाल तर आताच घाई करू नका.
ADVERTISEMENT


5/5
मीन राशी:
मीन राशीसाठी बाराव्या घरात योग तयार झाला आहे. यामुळे खर्च आणि मानसिक ताण येण्याची शक्यता आहे. नवीन व्यवहार किंवा गुंतवणूक टाळा. आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
