आजचा दिवस 'या' राशीतील लोकांसाठी कठीण, तर दिवसाच्या शेवटी मिळेल 'ही' गोष्ट
मुंबई तक
• 12:47 PM • 25 Jan 2026
Astrology : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला असेल. याचा परिणाम हा काही राशीतील लोकांवर आहे. चला तर काही राशीभविष्यातील अंदाज जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

1/5
ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला असेल. याचा परिणाम हा काही राशीतील लोकांवर आहे. चला तर काही राशीभविष्यातील अंदाज जाणून घेऊयात.

2/5
मेष राशी :
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा कठीण जाईल. आजच्या दिवशी काही लोकांना भीती जाणवेल. तसेच वायफळ पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. डोकेदुखी, डोळ्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच मानसिक ताण-तणाव निर्माण होईल, अशातच आराम करावा.
ADVERTISEMENT

3/5
वृषभ राशी :
या राशीतील लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. कुठेही अधिक तासांचा प्रवास करू नका. मनात विचारांचं काहुर माजेल, तुमचं मन एका ठिकाणी स्थिर राहणार नाही. तसेच आपण आरोग्याची काळजी घ्यावी.

4/5
वृश्चिक राशी :
या राशीतील लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असेल. मित्रांचे सहकार्य तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल. प्रेमाच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी, तसेच पार्टनरबरोबर चांगला व्यवहार ठेवावा. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावं.
ADVERTISEMENT

5/5
कुंभ राशी :
या राशीतील लोकांना आजच्या दिवशी सावधानतेचा इशारा देण्यात आला. आर्थिक संबंधित कोणत्याही गैर व्यवहारापासून दूर रहा. आरोग्याच्या बाबतीत चिंता जाणवेल.
ADVERTISEMENT










