Astrology : सूर्याचा वृषभ राशीत प्रवेश, 'या' राशींवर संकटाची टांगती तलवार, 12 राशींचं जाणून घ्या भविष्य

मुंबई तक

• 01:30 PM • 15 May 2026

Astrology : गोचरामुळे राहु आणि केतुचा विशेष केंद्रीय योग बनणार आहे. हा योग ज्योतिषशास्त्रात मोठा प्रभावशाली मानला जाते. अशा स्थितीत सूर्यावर राहु आणि केतू या दोघांची सावली पडणार आहे, ज्याचा परिणाम हा काही राशींवर होईल. 

follow google news
Astrology

1/13

सूर्य ग्रह हा वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरामुळे राहु आणि केतुचा विशेष केंद्रीय योग बनणार आहे. हा योग ज्योतिषशास्त्रात मोठा प्रभावशाली मानला जाते. अशा स्थितीत सूर्यावर राहु आणि केतू या दोघांची सावली पडणार आहे, ज्याचा परिणाम हा काही राशींवर होईल. 

Astrology

2/13

मेष 

मेष राशीतील लोकांनी धन आणि गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी. आर्थिक व्यवहारांमध्ये छोट्या चुकांमुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोकेदुखी, डोळ्यांच्या समस्या उद्भवतील, तसेच या राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. 
 

Astrology

3/13

मिथुन 

मिथुन राशीतील लोकांना वाढत्या आर्थिक दबावाला सामोरे जावे लागू शकते. जुन्या कर्जाचा डोंगर फेडता-फेडता नाकी नऊ येऊ शकतात. अनावश्यक प्रवासामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. 15 मे ते 15 जून 2026 दरम्यान प्रवास, करिअससंबंधी निर्णयांचा काळजीपूर्वक विचार करण्याचा सल्ला दिला जातो. 
 

Astrology

4/13

कन्या 

कन्या राशीच्या व्यक्तींना पुढील काही दिवस अधिकची सावधगिरी बाळगावी लागेल. तसेच अपघात किंवा दुखापतीची चिन्हे निर्माण होण्याची शक्यता आहे. मुलांच्या करिअरविषयी चिंता वाढण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात मोठी जोखीम घेणे टाळावे.  
 

Astrology

5/13

तूळ 

तूळ राशीसाठीचे हे संक्रमण करिअर आणि आरोग्य या दोन्ही बाबतीत सावधानता बाळगावी. कामातील किरकोळ चुका आपल्याला अडचणीत आणू शकतात. डोळ्यांच्या समस्या आणि दुखापती तसेच जुने वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

Astrology

6/13

मकर 

मकर राशीच्या व्यक्तींनी वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगावी. आरोग्य आणि पचनससंस्थेच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये कोणतेही नवीन उपक्रम किंवा जोखीम घेणे टाळावे. 
 

Astrology

7/13

कुंभ 

कुंभ राशीसाठी हा काळ तणावपूर्ण आणि चिडचिडेपणा अधिक जाणवण्याची शक्यता आहे. कामात आणि अभ्यासात अधिक मेहनत करावी लागू शकते. 
 

Astrology

8/13

सिंह 

सिंह राशीतील लोकांसाठी आजच्या दिवशी चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. एखादा मोठा प्रोजेक्ट मिळेल. 
 

Astrology

9/13

धनु 

या राशीतील लोकांची प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होतील. समाजात चांगली ओळख निर्माण होऊन आपलं वर्तुळ विस्तारेल. नशिबाची साथ आपल्या आयुष्यात एक उत्साह घेऊन येईल.

Astrology

10/13

वृश्चिक

वृश्चिक राशीतील लोकांना कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीत समाधानकारक स्थिती मिळेल, जमीन खरेदीचे संकेत असून वैवाहिक जीवनात विश्वास ठेवावा. 
 

Astrology

11/13

मीन 

अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल.
 

Astrology

12/13

वृषभ

कामाच्या ठिकाणी सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. शासकीय कामे रखडण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे. 
 

Astrology

13/13

कर्क

कार्यक्षेत्रात मान-सन्मान मिळेल. कला क्षेत्रात संधी उपलब्ध होतील. नोकरीत प्रमोशन किंवा यशाची शक्यता. स्थावर मालमत्तेसंबंधित कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. श्वसनाच्या समस्या असल्यास आपण सावधगिरी बाळगावी. 
 

हे वाचलं का?
follow whatsapp